बंगळुरु | टीम इंडिया-नेदरलँड्स आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळत आहेत. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्मा-शुबमन गिल या ओपनिंग जोडीने सलामी शतकी भागीदारी करत टीम इंडियाला कडक सुरुवात करुन दिली. शुबमन गिल याने या भागीदारीदरम्यान अर्धशतक ठोकले. शुबमन गिल याने या दरम्यान असा एक फटका मारला, ज्याची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. शुबमन गिल याने नेदरलँड्स विरुद्ध 95 मीटर लांब सिक्स फटकावला आहे. शुबमनने मारलेला सिक्स इतका कडक होता की बॉल थेट मैदानाबाहेर गेला.
आर्यन दत्त नेदरलँड्सकडून टीम इंडियाच्या डावातील तिसरी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर शुबमनने क्रीझमधून बाहेर येत लाँग ऑनच्या दिशने गगनचुंबी सिक्स मारला. शुबमनने इतका जोरात फटका मारला की बॉल थेट पार्किंग एरियामध्ये पोहचल्याचं समालोचकांनी सांगितलं.
शुबमनने नेदरलँड्स विरुद्ध अर्धशतकी खेळी केली. मात्र शुबमनला या अर्धशतकाचं रुपांतर शतकात करण्यात अपयश आलं. शुबमन अर्धशतकानंतर आऊट झाला. शुबमनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 12 वं अर्धशतक ठरलं. शुबमनने 32 बॉलमध्ये 3 चौकार आणि 4 सिक्सच्या मदतीने 51 धावांची खेळी केली.
शुबमनचा गगनचुंबी सिक्स
दरम्यान रोहित-शुबमन या सलामी जोडीने नेदरलँड्स विरुद्ध शतकी भागीदारी केली. या दोघांनी 2023 या वर्षात पाचव्यांदा शतकी भागीदारी केली आहे. रोहित आणि शुबमन या जोडीने आतापर्यंत टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका केली आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.