धर्मशाळा | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये विजयी घोडदौड कायम राखली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा हा या वर्ल्ड कपमधील हा सलग पाचवा विजय ठरला आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 274 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 48 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह वनडे वर्ल्ड कपमधील न्यझीलंड विरुद्धचा इतिहास बदलला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये 20 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध अखेरचा विजय हा 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये मिळवला होता.
विराट कोहली आणि मोहम्मद शमी हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मोहम्मद शमी याने आधी 5 विकेट्स घेत न्यूझीलंडला 273 धावांवर रोखलं. तर त्यानंतर विराट कोहली याने धावांचा पाठलाग करताना टीम इंडियासाठी निर्णायक क्षणी सर्वाधिक 95 धावांची विजयी खेळी केली. विराटचं 49 वं एकदिवसीय शतक हुकलं, मात्र टीम इंडियाचा विजयाचा निश्चित झाला. विराटने 104 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 8 चौकारांच्या मदतीने 95 धावा केल्या.
कोहलीशिवाय टीम इंडियाच्या फलंदाजांनी आपली जबाबादारी चोखपणे पार पाडली. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी 71 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा 46 धावा करुन आऊट झाला. शुबमन गिल याने 26 रन्सचं योगदान दिलं. श्रेयस अय्यर याने 33 रन्स केल्या. केएल राहुल याने 27 धावा जोडल्या. सुर्यकुमार यादव 2 रन्स करुन माघारी परतला. तर रविंद्र जडेजा याने नाबाद 39 धावांची निर्णायक खेळी केली. तसेच मोहम्मद शमी 1 रन करुन नाबाद परतला. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्यूसन याने 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट, मॅट हॅनरी आणि मिचेल सँटनर या तिकडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाचा विजयी पंच
India 🇮🇳 make it FIVE in a row!
Ravindra Jadeja with the winning runs 🔥🔥
King Kohli 👑 reigns supreme in yet another run-chase for #TeamIndia 😎#CWC23 | #MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/d6pQU7DSra
— BCCI (@BCCI) October 22, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.