मुंबई | कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात वर्ल्ड कपमध्ये सलग सातवा विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील सातवा सामना हा श्रीलंका विरुद्ध होणार आहे. हा सामना 2 नोव्हेंबर रोजी कॅप्टन रोहित शर्मा याच्या होम ग्राउंड अर्थात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका आपलं वर्ल्ड कपमधील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. कॅप्टन रोहित श्रीलंका विरुद्धच्या सामन्यातून प्लेईंग ईलेव्हनमधून एका मुंबईकर खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी सज्ज आहे.
साधारणपणे विनिंग टीमच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केला जात नाही. मात्र टीम इंडियाचा एका खेळाडू आहे जो सातत्याने संधी मिळूनही अपयशी ठरतोय. या खेळाडूमुळे दुसऱ्या खेळाडूला बाहेर बसावं लागलंय. त्यामुळे कॅप्टन रोहित श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी टीममध्ये किमान 1 बदल करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. आता प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आणि कुणाला संधी मिळणार हे आपण जाणून घेऊयात.
श्रेयस अय्यर याला श्रीलंका विरुद्धच्या सामन्यातून बाहेर ठेवलं जाऊ शकतं. तर त्याच्या जागी विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याचा समावेश केला जाऊ शकतो. श्रेयसला आतापर्यंत 6 सामन्यांमध्ये संधी देण्यात आली आहे. श्रेयसने या 6 सामन्यांमध्ये 33.50 सरासरी आणि 84.81 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 134 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला ईशानला श्रेयसच्या तुलनेत फार संधी मिळाली नाहीये. त्यामुळे श्रीलंका विरुद्ध श्रेयसच्या जागी ईशानला संधी दिली जाऊ शकते.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर आणि इशान किशन.
वनडे वर्ल्ड कपसाठी श्रीलंका टीम | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश तीक्षना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा आणि कुसल परेरा.