बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील 8 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. वर्ल्ड कपमधील 8 फेऱ्यानंतर टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं आहे. आता सेमी फायनलच्या एका जागेसाठी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात रस्सीखेच आहे. वर्ल्ड कपमधील नवव्या आणि अखेरच्या फेरीला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या नवव्या फेरीतील पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघांचा साखळी फेरीतील अखेरचा सामना असणार आहे. हा सामना गुरुवारी 9 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास सेमी फायनलमध्ये कोणती टीम पोहचणार, हे आपण जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर सेमी फायनलचं समीकरण कसं ठरेल? समजून घेऊयात. सामना रद्द झाल्यास न्यूझीलंड दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात येईल. त्यामुळे श्रीलंकेचे 5 पॉइंट्स होतील. श्रीलंका वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडलीय. त्यामुळे श्रीलंकेला तसा काही फरक पडणार नाही. मात्र या 1 पॉइंटमुळे न्यूझीलंडचे 9 पॉइंट्स होतील. याचा फायदा होईल तो पाकिस्तानला. कारण पाकिस्तानने आपला साखळी फेरीतील इंग्लंड विरुद्धचा सामना जिंकला तर ते थेट सेमी फायनलमधील पोहचतील. मात्र त्यासाठी अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिका विरुद्ध पराभव व्हावा लागेल.
तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचा श्रीलंका विरुद्ध आणि पाकिस्तानचा इंग्लंड विरुद्ध पराभव झाल्यास अफगाणिस्तानने अखेरचा दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामना जिंकला, तर ते सेमी फायनलसाठी क्वालिफाय करतील.
तसेच अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका विरुद्ध पराभूत झाल्यास आणि न्यूझीलंडने श्रीलंकेवर विजय मिळवला, तर पाकिस्तानला फक्त सामना जिंकून चालणार नाही. पाकिस्तानला चांगल्या रनरेटने विजय मिळवावा लागेल. त्यामुळे एका जागेसाठी चांगलीच रस्सीखेच दिसून येत आहे.
दरम्यान गुरुवारी बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये न्यूझीलंड-श्रीलंका सामन्यादरम्यान पावसाची 70 टक्के शक्यता आहे. त्यामुळे आता सेमी फायनलमधील चौथी टीम ठरवण्यात हवामानाचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेट टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम लॅथम (विकेटकीपर), डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, कायल जेमिसन, जेम्स नीशम आणि विल यंग.
श्रीलंका क्रिकेट टीम | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका, दिमुथ करुणारत्ने, दुष्मंता हेमंता, दिमुथ करुणारथने, लहीरु कुमारा आणि दुनिथ वेल्लालागे.