चेन्नई | अफगाणिस्तानने ढिसाळ बॅटिंग आणि खराब फिल्डिंगच्या जोरावर न्यूझीलंड विरुद्ध 149 धावांनी सामना गमावलाय. न्यूझीलंडने वर्ल्ड कपमधील सलग चौथा विजय मिळवला आहे. न्यूझीलंडचा मिडल ऑर्डर फ्लॉप ठरल्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि कॅप्टन टॉम लॅथम या जोडीने पाचव्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडने या भागीदारीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 288 पर्यंत मजल मारत अफगाणिस्तानला विजयासाठी 289 धावांचं आव्हान दिलं. मात्र अफगाणिस्तानने फ्लॉप कामगिरी करत न्यूझीलंडसमोर गुडघे टेकले. अफगाणिस्तानने 34.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 139 धावा केल्या. अफगाणिस्तानचा हा या स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला.
अफगाणिस्तानकडून रहमत शाह याने सर्वाधिक 36 धावा केल्या. अझमतुल्लाह ओमरझई याने 27 धावा जोडल्या. इक्रम अलीखिल याने याने अखेरपर्यंत नाबाद 19 धावांचं योगदान दिलं. तर इब्राहीम झद्रान याने 14 आणि रहमानुल्लाह गुरुबाज याने 11 धावा केल्या. दोघं आले तसेच गेले. तर चौघांना भोपळाही फोडता आला नाही. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि लॉकी फर्ग्यूसन या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. ट्रेन्ट बोल्ट याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मॅट हॅन्री आणि रचिन रविंद्र या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

त्याआधी अफगाणिस्तानने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगला बोलावलं. पहिला धक्का 20 धावांवर दिला. त्यानंतर अफगाणिस्तानने पुढील 3 विकेट्स या 1 धावेच्या मोबदल्यात घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. न्यूझीलंडची 4 बाद 110 अशी स्थिती झाली. डेव्हॉन कॉन्व्हे 20, रचिन रवींद्र 32, विल यंग 54 आणि डॅरेल मिचेल याने 1 रन केली. त्यानंतर टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 144 धावांची निर्णायक भागीदारी करत मॅच फिरवली. या दरम्यान अफगाणिस्तानने कॅच सोडल्या. अफगाणिस्तानने एकूण 7 कॅच सोडत सामन्यावरची पकड गमावली.
टॉम आणि ग्लेन या दोघांच्या भागीदारीमुळे अफगाणिस्तान मजबूत स्थितीत पोहचली. या दोघांमध्ये झालेल्या 144 भागीदारीमुळे न्यूझीलंडने 254 धावा केल्या. मात्र त्यानंतर दोघेही एकाच ओव्हरमध्ये झटपट आऊट झाला. लॅथमने 68 आणि फिलिप्स याने 71 धावा केल्या. तर चॅपमॅन याने अखेरीस 25* आणि सँटनरने 7* धावा केल्या. अफगाणिस्तानकडून अझमतुल्लाह आमि नवीन उल हक या दोघांनी 2 विकेट्स मिळवल्या. तर मुजीब उर रहमान आणि राशिद खान या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.