चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 16 वा सामना हा न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात खेळवण्यात येणार आहे.न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा हा चौथा सामना असणार आहे. न्यूझीलंडने आपले तिन्ही सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्तानने आपल्या अखेरच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडवर मात करत पहिला विजय मिळवला. आता अफगाणिस्तान न्यूझीलंडचा पराभव करत या स्पर्धेत दुसऱ्यांदा उलटफेर करणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना बुधवारी 18 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना चेन्नईतील एम ए चिंदबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार या एपवर फुकटात पाहायला मिळेल.
न्यूझीलंड 3 विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अफगाणिस्तान एका विजयासह सहाव्या स्थानी विराजमान आहे. आता या सामन्यात कोण बाजी मारतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.
न्यूझीलंड टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि विल यंग.