हैदराबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिली फेरी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. त्यानंतर आज 9 ऑक्टोबरपासून दुसऱ्या राऊंडला सुरुवात होत आहे. दुसऱ्या राऊंडमधील पहिला आणि वर्ल्ड कप साखळी फेरीतील सहाव्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने आहेत. नेदरलँड्सने या सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दोन्ही संघांचा वर्ल्ड कपमधील हा दुसरा सामना आहे. या दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
न्यूझीलंड आणि नेदरलँड्स दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम याने 1 बदल केला आहे. जिमी शिनम याच्या जागी लॉकी फर्ग्युसन याला संधी दिली आहे. तर न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियमन्सन हा या सामन्यातही खेळणार नाहीये. तसेच नेदरलँड्सने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत.
दरम्यान न्यूझीलंड आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांचा आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील दुसरा सामना आहे. या आधी न्यूझीलंडने वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना हा इंग्लंड विरुद्ध खेळला होता. न्यूझीलंडने त्या सामन्यात इंग्लंडवर 9 विकेट्सने विजय मिळवला होता. तर नेदरलँड्सने पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळला. पाकिस्तानने त्या सामन्यात नेदरलँड्सला 81 धावांनी पराभूत केलं होतं. मात्र नेदरलँड्सने पाकिस्तान विरुद्ध चांगली फाईट दिली होती.
Netherlands opt to field after winning the toss in Hyderabad 🏏
A key Kiwi pacer makes his return 👀#CWC23 | #NZvNED 📝: https://t.co/Ogi7AEq6JT pic.twitter.com/h3ARnZybE9
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 9, 2023
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्होन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सेंटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन आणि ट्रेन्ट बोल्ट.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओ’डॉउड, कॉलिन एकरमॅन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंगेलब्रेक्ट, रूलोफ वॅन डेर मेरवे, रयान क्लेन, आर्यन दत्त आणि पॉल वॅन मीकेरेन.