CWC 2023 PAK vs NED | नेदरलँड्सने टॉस जिंकला, पाकिस्तान विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?

| Updated on: Oct 06, 2023 | 2:09 PM

Icc World Cup 2023 Pakistan vs Netherlands Toss News | नेदरलँड्स टीम आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये 12 वर्षांनी खेळत आहे. नेदरलँड्सने वर्ल्ड कपमधील आपल्या पहिल्याच सामन्यात टॉस जिंकला आहे.

CWC 2023 PAK vs NED | नेदरलँड्सने टॉस जिंकला, पाकिस्तान विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
Follow us on

हैदराबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. नेदरलँड्सने टॉस जिंकला. नेदरलँड्स कॅप्टनने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. त्यामुळे आता नेदरलँड्स पाकिस्तानच्या बॅटिंगला किती धावांपर्यंत रोखतात याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष असणार आहे. पाकिस्तानचं नेतृत्व बाबर आझम करणार आहे. तर स्कॉट एडवर्ड्स याच्याकडे नेदरलँड्सची सूत्रं आहेत.

पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स 20 वर्षांनी आमनेसामने

पाकिस्तान आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांचा आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील हा पहिलाच सामना आहे. तसेच हे दोन्ही संघ वर्ल्ड कपमध्ये तब्बल 20 वर्षांनंतर आमनेसामने खेळत आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्स या दोन्ही संघ 2003 च्या एकदिवसीय वनडे वर्ल्ड कपमध्ये अखेरचा सामना खेळले होते.

नेदरलँड्स 12 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये

दरम्यान नेदरलँड्सने 12 वर्षांनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलंय. नेदरलँड्सने आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये 2 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या वेस्टइंडिजला पराभूत केलं. तसेच स्कॉटलँडलाही पराभवाची धुळ चारली. नेदरलँड्सने अशाप्रकारे वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं. नेदरलँड्सने अखेरचा वर्ल्ड कप हा 12 वर्षांपूर्वी 2011 साली भारतातच खेळला होता. त्यामुळे नेदरलँड्सची यंदा 12 वर्षांनंतर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.

पाकिस्तानचे 11 शिलेदार

दरम्यान हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये गेल्या 3 सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. त्यामुळे आता या चौथ्या सामन्यात पाकिस्तान ही परंपरा कायम ठेवते की नेदरलँड्स उलटफेर करते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), इमाम उल हक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.

नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.