हैदरबाद | वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला पाणी पाजलं. न्यूझीलंडने इंग्लंडला 9 विकेट्सने पराभूत करत विजयी सुरुवात केली. आता त्यानंतर दुसरा सामना हा पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात होणार आहे. हा सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. नेदरलँड्स विरुद्ध सामना असल्याने पाकिस्तानला तसं फार काळजी करण्याचं कारण नाही. मात्र त्यानंतरही पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम हा टेन्शनमध्ये आहे. नक्की का हे आपण समजून घेऊयात.
आतापर्यंत आशिया कप 2023 स्पर्धेतील काही सामने पावसामुळे रद्द झालेत. तोच प्रकार वनडे वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात झाला. टीम इंडियाचे दोन्ही सराव सामने हे पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामन्याशिवाय खेळणार आहे. आता शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामन्यादरम्यान हवामान कसं असेल? सामन्यादरम्यान पाऊस होईल का हे आपण समजून घेऊयात.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, शुक्रवारी हैदराबादमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. हैदराबादमध्ये ऊन असेल. त्यामुळे सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय होईल. मात्र सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात येईल. आता 1 पॉइंट मिळाला की पॉइंट्स टेबलमध्ये सेमी फायनल पात्रतेच्या समीकरणात हिशोब वेगळा होतो. 1 पॉइंटमुळे सर्व काही गणित बदलतं.त्यामुळे कॅप्टन बाबरला टेन्शन आहे.
नेदरलँड्स क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.
पाकिस्तान टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.