मुंबई | आयसीसीने दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामन्यानंतर आणि टीम इंडिया-बांगलादेश सामन्याआधी वनडे रँकिंग जाहीर केली आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये टीम इंडियाचे 3 खेळाडू विराजमान आहेत. विराट कोहली याला मोठं नुकसान झालं आहे. तर कॅप्टन रोहित शर्मा याला मोठा फायदा झाला आहे. तर अव्वल स्थानी कोण आहे याबाबतही क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. टीम इंडियाच्या 3 खेळाडूंसह टॉप 10 मध्ये कोण कुठे आहे? तसेच कुणाला फायदा आणि कुणाला तोटा झालाय हे आपण जाणून घेऊयात.
विराटला आयसीसी वनडे रँकिंगमध्ये किंचितसा तोटा झालाय. विराटला एका स्थानाचं नुकसान झालंय. त्यामुळे विराट सातव्या क्रमांकावरुन संयुक्तरिक्या आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. विराटच्या नावावर 711 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. विराटने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात 16 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडचा डेव्हिड मलान याच्याकडेही 711 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. कॅप्टन रोहित शर्मा याने 5 स्थांनीच झेप घेत सहाव्या स्थानी पोहचला आहे. रोहितचे 719 रेटिंग्स आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिरोवर आऊट झाल्यानंतर रोहितने अफगाणिस्तान विरुद्ध 131 आणि पाकिस्तान विरुद्ध शानदार 86 धावा केल्या.
पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम आणि शुबमन गिल या दोघांमध्ये पहिल्या क्रमांकासाठी रस्सीखेच सुरु आहे. एका बाजूला बाबरसमोर अव्वल स्थान कायम राखण्याचं आव्हान आहे. तर शुबमन गिलचा डोळा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता या रँकिगनुसार पहिल्या क्रमांकावर कोण आहे, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. तर आयसीसीच्या अपडेटनुसार बाबर आझम याला अव्वल स्थान कायम राखण्यात यश आलंय. तर शुबमन गिल हा देखील दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. बाबरच्या नाववर 836 आणि शुबमनकडे 818 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण कुठे?
Big movement at the top of the @MRFWorldwide ODI Player Rankings for a host of @cricketworldcup stars 💥#CWC23https://t.co/oK31QUOz75
— ICC (@ICC) October 18, 2023
दरम्यान बॉलिंग रॅकिंगमधील टॉप 10 मध्ये टीम इंडियाच्या 2 गोलंदाजांचा समावेश आहे. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज हे दोघे पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये आहेत. मोहम्मद सिराज 656 रेटिंग्स पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कुलदीपल यादव 641 पॉइंट्ससह सहाव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड हा 660 पॉइंट्ससह अव्वलस्थानी आहे.