धर्मशाळा | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवत वनडे वर्ल्ड कप 2019 सेमी फायनलमधील पराभवाचा वचपा घेतला. टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्ध वनडे वर्ल्ड कप इतिहासात 20 वर्षानंतर पहिला विजय ठरला. तसेच टीम इंडियाने या विजयासह 13 व्या वर्ल्ड कपमधील सलग पाचवा विजय मिळवला. आता टीम इंडिया सेमी फायनलपासून अगदी जवळ आली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत विजय मिळवला, मात्र त्याचा फायदा कमी आणि तोटाच जास्त झालाय. ते कसं समजून घेऊयात.
न्यूझीलंडने डॅरेल मिचेल याच्या 130 धावांची शतकी खेली केली आणि रचिन रविंद्र याच्या 75 धावांच्या जोरावर टीम इंडियासमोर 274 धावांचं आव्हान ठेवलं. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने 5 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने हे आव्हान 48 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाकडून विराट कोहली याने 95 रन्स केल्या. तर रोहित शर्मा याने 46 धावांचं योगदान दिलं. अखेरीस रविंद्र जडेजा याची 39 धावांची नाबाद खेळी केली ही निर्णायक ठरली. भारताने 274 धावा करेपर्यंत 6 विकेट्स गमावल्या.
टीम इंडियाने हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 स्थान पटकावलं. टीम इंडियामुळे न्यूझीलंडची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. टीम इंडियाला जिंकल्यामुळे 2 पॉइंट्स मिळाले. मात्र पॉइंट्सशिवाय टीम इंडियाला काहीच मिळालं नाही. उलट टीम इंडियाचा तोटाच झाला,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचा नेट रनरेट हा कमी झालाय. जेव्हा दोन्ही टीमचे पॉइंट्स सारखे सारखे असतात, तेव्हा संबंधित टीमला झुकतं माप देण्यासाठी नेट रन रेटचा निकष लावला जातो. त्यामुळे टीम इंडियाला जिंकूनही एका प्रकारे हा तोटाच आहे, असं म्हटलं तर चूक होणार नाही.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
न्यूझीलंड नेट रन रेट | +1.923
टीम इंडिया नेट रन रेट | +1.659
न्यूझीलंड नेट रन रेट +1.481
टीम इंडिया नेट रन रेट +1.353
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.