टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 15 व्या आणि अखेरच्या सामन्यात बांगलादेशसमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 183 धावा केल्या. टीम इंडियाकडून संजू सॅमसन याचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाजांनी शानदार बॅटिंग केली. विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने 18 महिन्यांच्या कमबॅकनंतर शानदार अर्धशतक ठोकलं. तर सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि कॅप्टन रोहित शर्मा या तिघांनी 20+ धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 180 पार मजल मारता आली.
टीम इंडियाकडून एकूण 7 जणांनी बॅटिंग केली. संजू सॅमसन 1 रन करुन आऊट झाला. तर रवींद्र जडेजा 4 धावा करुन नाबाद परतला. तर उर्वरित 5 जणांना दुहेरी आकडा गाठता आला. टीम इंडियाकडून ऋषभ पंत याने 32 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली. पंत अर्धशतकानंतर रिटायर्ड आऊट झाला. पंतनंतर हार्दि पंड्या याने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. पंड्याने 23 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह नाबा 40 धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने 18 बॉलमध्ये 31 रन्स केल्या. कॅप्टन रोहित शर्मा याने 19 बॉलमध्ये 23 रन्स जोडल्या. तर शिवम दुबे याने 16 बॉलमध्ये 14 धावा केल्या. बांगलादेशकडून एकूण 8 जणांनी बॉलिंग टाकली. त्या 8 पैकी फक्त चौघांनाच विकेट मिळाली. बांगलादेशसाठी मेहदी हसन, महमदुल्लाह, शोरिफूल इस्लाम आणि तन्वीर इस्लाम या चौघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
टीम इंडियाच्या 20 ओव्हरमध्ये 182 धावा
Innings Break!#TeamIndia set a 🎯 of 1⃣8⃣3⃣ in the warmup match against Bangladesh 🙌
Over to our bowlers 💪
Scorecard ▶️ https://t.co/EmJRUPmJyn #T20WorldCup pic.twitter.com/6CEMDec2cZ
— BCCI (@BCCI) June 1, 2024
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
बांगलादेश प्लेईंग टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), सौम्या सरकार, तौहीद ह्रदोय, साकिब अल हसन, महमुदुल्लाह, जाकेर अली, महेदी हसन, रिशाद हुसेन, शोरीफुल इस्लाम, तन्झिद हसन, तन्झिम हसन साकिब आणि तन्वीर इस्लाम.