आयपीएलच्या 17 व्या हंगामानंतर क्रिकेट चाहत्यांना टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. 20 संघांनी आपल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. टीम इंडियाही सराव सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा एकमेव सराव सामना असणार आहे. या सराव सामन्याबाबत जाणून घेऊयात.
टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू हे 2 तुकड्यांमध्ये अमेरिकेत पोहचणार आहे. त्यापैकी पहिली तुकडी आधीच पोहचली आहे. टीम इंडिया आपला एकमेव सराव सामना हा शनिवारी 1 जून रोजी खेळणार आहे. त्यानंतर 2 जूननंतर मुख्य स्पर्धेचा श्रीगणेशा होईल.
टीम इंडियाचा एकमेव सराव सामना हा बांगलादेश विरुद्ध होणार आहे. सराव सामन्यांना सोमवार 27 मे पासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना हा नेपाळ विरुद्ध कॅनेडा यांच्यात पार पडला. मुख्य स्पर्धेआधी खेळाडूंना इथल्या परिस्थितीची माहिती होईल. त्यामुळे सराव सामना फार महत्त्वपूर्ण असणार आहे. टीम इंडियाच्या पहिल्या तुकडीतील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या तुकडीतील खेळाडू पोहचल्यानंतर संपूर्ण ताकदीने सराव केला जाईल. टीम इंडियाचा सराव सामना तिथेच होणार जिथे पाकिस्तान विरुद्ध महामुकाबला आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सराव सामना फार महत्त्वाचा असणार आहे.
टीम इंडियाच्या सामन्यांना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे वर्ल्ड कपमधील सामने हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळणार आहेत. तर सामने मोबाईलवर फुकटात डिज्ने हॉटस्टार एपवर पाहायला मिळतील.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान