मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 ( World Test Championship final) च्या अंतिम सामन्यासाठी नुकतीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यासह टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यासाठीही निवड करण्यात आली. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18-22 जून दरम्यान साऊथँम्पटन येथे हा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. निवड समितीने निवडलेल्या संघात राखीव खेळाडू म्हणून 23 वर्षीय गोलंदाज अर्जन नागवासवाला (Arzan Nagwaswalla) याचीही निवड करण्यात आली आहे. तो मूळचा गुजरातचा आहे. त्याच्या निवडीबरोबरच 46 पाठीमागच्या वर्षांत कधी नव्हे तो इतिहास घडलाय. (ICC World Test Championship final 2021 Arzan Nagwaswalla make A History in 46 year To selected Team India)
मूळचा गुजराती असलेला अर्जनचं वय वर्ष केवळ 23 आहे. इतक्या कमी वयात त्याने खास इतिहास रचला आहे. 46 वर्षानंतर प्रथमच भारतीय संघात निवड झालेला तो पहिला पारशी खेळाडू आहे. अर्जन अगोदर फारुख इंजिनिअर (Farokh Engineer) भारतीय संघात खेळले होते. त्यानंतरच्या 46 वर्षांत कोणत्याही पारशी खेळाडूला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळू शकली नाही किंबहुना पारशी खेळाडू भारतीय संघाचं दार ठोठावू शकले नाहीत.
Arzan Nagwaswalla is a new addition in the #TeamIndia squad as a standby player. @GCAMotera
Watch this to know what he is capable of ? ?
— BCCI Domestic (@BCCIdomestic) May 7, 2021
भारतीय संघात शेवटची पारशी महिला क्रिकेटर म्हणून डायना एडुल्जी यांचं नाव घ्यावं लागेल. त्या शेवटच्या पारसी महिला क्रिकेटर होत्या ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतरच्या 28 वर्षांत भारतीय महिला क्रिकेट संघात देखील पारशी महिल क्रिकेटरने इन्ट्री मिळवलेली दिसून येत नाही. डायना एडुल्जी यांनी 1993 साली त्यांची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती.
अर्जन नागवासवाला गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील नारगोल गावचा रहिवासी आहे. त्याने गुजरातसाठी 16 फर्स्ट क्लास, 20 लिस्ट ए आणि 15 टी ट्वेन्टी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे 62, 39 आणि 21 विकेट्स घेतल्या आहेत.
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. तर केएल राहुल आणि वृद्धिमान साहा या दोघांना त्यांच्या प्रकृतीत सुधार झाल्यास संधी मिळेल.
राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्झान नाग्वास्वाल्ला.
ICYMI – A look at #TeamIndia‘s squad for the inaugural ICC World Test Championship (WTC) final and the five-match Test series against England. ?
Standby players: Abhimanyu Easwaran, Prasidh Krishna, Avesh Khan, Arzan Nagwaswalla pic.twitter.com/17J050QVT3
— BCCI (@BCCI) May 7, 2021
(ICC World Test Championship final 2021 Arzan Nagwaswalla make A History in 46 year To selected Team India)
हे ही वाचा :