मुंबई : भारतात कोरोना उद्रेकामुळे चिंताजनक (India corona) स्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध आणि लॉकडाऊन (lockdown) लावण्यात येत आहेत. देशात दररोज 2 लाखांच्या आसपास रुग्णसंख्या मिळत आहे. त्यामुळे अनेक देशांनी भारताला रेड लिस्टमध्ये (India red list) टाकलं आहे. भारतात जाण्यास किंवा भारतातून येण्यास निर्बंध घातले आहेत. त्याचाच फटका टीम इंडियाला (Team India) बसण्याची शक्यता आहे. इंग्लंडने भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. त्यामुळे ब्रिटनने भारताच्या सर्व प्रवासावर बंदी घातली आहे. भारतातून इंग्लंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांना 10 दिवस क्वारंटाईन सक्तीचं केलं आहे. (ICC World Test Championship final will go ahead as planned said icc what will team india do during covid pendamic virat kohli)
अशा परिस्थितीत टीम इंडियाला जून महिन्यात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी मैदानात उतरायचं आहे. साऊदम्पटन इथे न्यूझीलंडविरुद्ध भारत अशी फायनल होणार आहे. मात्र या फायनलवर आता कोरोनाचं संकट आहे.
भारतात कोरोना उद्रेक असला, तरी ICC निर्धारित वेळेतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळवण्यावर ठाम आहे. “इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि दुसऱ्या बोर्डांनी कोरोना संकटात संपूर्ण सुरक्षितपणे फायनलचं नियोजन करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हा सामना ठरल्या वेळेतच होईल. सध्या आम्ही इंग्लंड सरकारशी रेड लिस्टमधील देशांवर असलेल्या प्रभावाबाबत बातचीत करत आहोत. भारतीय महिला संघही जून महिन्यात यूके दौऱ्यावर आहे. तर पुरुष संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे”, असं आयसीसीने म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कोरोनो संकटात काही नियम सैल केले आहेत. खेळाडूंना क्वारंटाईन राहावं लागतं, काहींना संसर्ग होऊ शकतो त्यामुळे अतिरिक्त खेळाडूंना दौऱ्यावर नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार 7 अतिरिक्त खेळाडू, सपोर्ट स्टाफला दौऱ्यावर नेण्यास परवानगी असेल. त्यामुळे भारतीय टीम जून महिन्यात होणाऱ्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी 30 जणांच्या ताफ्यासह इंग्लंडला रवाना होऊ शकते.
संबंधित बातम्या
MS Dhoni | महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोना, रांचीतील रुग्णालयात दाखल
(ICC World Test Championship final will go ahead as planned said icc what will team india do during covid pendamic virat kohli)