मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदासाठी भारतीय संघाकडून क्रीडाप्रेमींना खूपच अपेक्षा आहेत. कारण भारतीय संघाचे खेळाडू चांगलेच फॉर्मात आहेत. सध्या संघात असलेल्या खेळाडूंनी बॉर्डर गावसकर ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने क्रीडा रसिकांना खूश केलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करून जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे. तसेच गेल्या दहा वर्षांपासून असलेला आयसीसी चषकाचा दुष्काळ दूर करता येणार आहे. या सामन्यात टीम इंडिया नव्या जर्सीत उतरणार आहे. तत्पूर्वी या जर्सीसह टीम इंडियाचं फोटोसेशन झालं. यावेळी टीम इंडियाचे खेळाडू मस्तीच्या रंगात दिसले. यावेळी इशान किशनने शुभमन गिलकडे अनोखी डिमांड केली.
भारताला एडिडासच्या रुपाने नव्या किट स्पॉन्सर मिळाला आहे. या नव्या जर्सीत टीम इंडियाच्या खेळाडूंनी फोटो शूट केलं. यावेळी इशान किशनने शुभमन गिलकडे कपडे फाडण्याची विनंती केली. फोटोग्राफर यावेळई खेळाडूंकडे वेगवेगळ्या पोझ मागत होता. तेव्हा गिल फोटोग्राफीसाठी पुढे आला तेव्हा त्याने टीशर्टवर हात ठेवला. तेव्हा इशान किशनने मागून जोरात सांगितलं की ‘फाड न कपडा.’ तेव्हा शुभमन गिलने टीशर्ट पकडून जोरात ओरडण्याची अॅक्शन केली.
शुभमन गिल सध्या चांगलाच फॉर्मात आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळणार हे निश्चित आहे. पण इशान किशनला टेस्टमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळते की नाही याबाबत संशय आहे. इशान किशनला संधी मिळाली तर त्या ऋषभ पंतची जागा भरून काढता येईल. केएस भरतही एक चांगला विकेटकीपर आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
WTC Final साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.