Champions Trophy 2025 : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास कोणत्या संघाला मिळणार संधी? जाणून घ्या

| Updated on: Jul 11, 2024 | 2:40 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा अवघ्या सात महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. पण ही स्पर्धा पाकिस्तानात होत असल्याने भारतीय संघ खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. जर भारताने न जाण्याचा निर्णय घेतला तर आयसीसी कोणत्या संघाला संधी देणार ते जाणून घ्या.

Champions Trophy 2025 : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास कोणत्या संघाला मिळणार संधी? जाणून घ्या
Follow us on

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे सर्वांनाच वेध लागले आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाकडून जोरदार तयारी सुरू आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली आणि रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया या स्पर्धेत उतरणार आहे. जय शाह यांनी रोहित शर्मा या स्पर्धेत कर्णधार असेल हे स्पष्ट केलं आहे. पण सर्वात मोठी अडचण अशी आहे की ही स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणारी दहशतवादी कृत्य पाहून भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ ना पाकिस्तानात जात आणि ना पाकिस्तान संघाला मायदेशी खेळण्यासाठी बोलवत. असं असताना भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार की नाही हा प्रश्न आहे. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ हायब्रिड मॉडेलवर खेळला होता. तेव्हा भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर काहीतरी तोडगा निघेल अशी क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे. पण ही स्पर्धा पाकिस्तानातच झाली आणि भारतीय संघाने खेळण्यास नकार दिला तर पुढचं गणित कसं असेल? जाणून घेऊयात.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेलवर स्पर्धा करण्यास नकार दिला तर मात्र टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडू शकते. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली तर वेळापत्रकात उलथापालथ होईल. यासाठी आयसीसीला आठव्या संघाचा बंदोबस्त करावा लागेल. आयसीसी यासाठी श्रीलंकेला स्पर्धेत संधी देऊ शकते. त्यामुळे आठ संघ होतील आणि पुढचा प्रश्नच उरणार आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टॉप 8 संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एन्ट्री मिळाली आहे. सध्या यात श्रीलंकन संघ नाही.

भारताने माघार घेतल्यानंतर आयसीसीकडे श्रीलंकेचा पर्याय उरणार आहे. कारण गुणतालिकेत श्रीलंकनं संघ नवव्या स्थानावर आहे. प्रारुप वेळपत्रकात भारताऐवजी श्रीलंकन संघ येईल. तसेच भारताचे सामने ज्या दिवशी आयोजित केले आहेत. तिथे श्रीलंकेला संधी दिली जाईल. म्हणजेच अ गटात पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे संघ राहतील. प्रारुप वेळापत्रकानुसार 19 फ्रेबुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. तसेच 9 मार्चला अंतिम सामना असणार आहे. तसेच 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.