रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळला तर अशी असू शकते प्लेइंग 11, या दिग्गज फलंदाजाचा पत्ता होणार कट!

| Updated on: Nov 16, 2024 | 5:56 PM

न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने गमावल्यानंतर टीम इंडिया अडचणीत आली आहे. त्यात रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. रोहित शर्मा दुसऱ्यांदा वडील झाला असून पत्नी रितिकाने मुलाला जन्म दिला आहे.

रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळला तर अशी असू शकते प्लेइंग 11, या दिग्गज फलंदाजाचा पत्ता होणार कट!
Image Credit source: BCCI
Follow us on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताला ही मालिका काहीही करून 4-0 किंवा 4-1 ने जिंकणं भाग आहे. असं असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दारूण पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने टीम इंडियाची अग्निपरीक्षा आहे. खरं तर या मालिकेपूर्वीत टीम इंडियावर दबाव तयार झाला आहे. या मालिकेत जर निकाल उलटा पडला तर भारताचं तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगणार आहे. भारताने 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका जिंकली होती. त्यामुळे तिसऱ्यांदा मालिका जिंकून हॅटट्रीक करण्याचा मानस आहे. पण ही मालिका जिंकणं भारतासाठी कठीण आव्हान असणार आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियासोबत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.

रोहित शर्माच्या घरी नवीन पाहुणा आला आहे. पत्नी रितिकाने मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे रोहित शर्मा अजूनही टीम इंडियासोबत गेलेला नाही. आता येत्या दोन ते तीन दिवसात टीम इंडियासोबत सराव करेल अशी अपेक्षा आहे. जर असं झालं तर रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळताना दिसेल यात शंका नाही. पहिल्या कसोटीसाठी अजून काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. रोहित शर्माने पूर्णपणे फॉर्म गमावलेला आहे. पण संघाला एक कणखर कर्णधार आणि चांगल्या ओपनरची गरज आहे. रोहित शर्माला पर्याय म्हणून केएल राहुल आणि अभिमन्यू ईश्वरन यांना संघात सहभागी केलं आहे. त्यात केएल राहुलच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे. पण दुखापत गंभीर नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालसोबत केएल राहुल ओपनिंग करू शकतो.

रोहित शर्मा जर पहिल्या सामन्यात खेळणार असेल तर मात्र केएल राहुलचा प्लेइंग 11 मधून पत्ता कापला जाऊ शकतो. कारण त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटीतही संधी मिळाली नव्हती. केएल राहुल ऑस्ट्रेलियात इंडिया ए कडून खेळला आहे. पण कसोटीत त्याने 4 आणि 10 अशा धावा केल्या. त्यामुळे केएल राहुलला पहिल्या कसोटी रोहित शर्मा खेळणार असेल तर बसावं लागू शकतं.

भारताची अशी असू शकते प्लेइंग 11: रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, आकाश दीप, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.