प्रयागराजमधील आयोजित महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्ध झालेला आयआयटी बाबा उर्फ अभय सिंह आता सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे. आयआयटी बाबाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चलती पाहायला मिळतेय. प्रसिद्धी मिळाल्यानंतर आयआयटी बाबाने टीम इंडिया विरुद्ध-पाकिस्तान सामन्याबाबत भविष्यवाणी केली. टीम इंडिया हा सामना गमावणार असं भाकीत आयआयटी बाबाने केले. मात्र हा आयआयटी बाबा काही तासांतच तोंडावर आपाटलाय. टीम इंडियाने 23 फेब्रुवारीला दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय. टीम इंडियाच्या या विजयानंतर या नेटकऱ्यांकडून या बाबाचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे.
“मी तुम्हाला आधीच सांगतो या वेळेस टीम इंडिया जिंकणार नाही”, असं म्हणत आयआयटी बाबाने भविष्यवाणी केली होती. आयआयटी बाबाच्या या भविष्यवाणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा बाबा तेव्हापासूनच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होता. कधी टीम इंडिया जिंकते आणि या बाबाला आम्ही टप्प्यात घेतो? याची प्रतिक्षाच नेटकऱ्यांना होती. टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि नेटकऱ्यांनी या बाबाकडे आपला मोर्चा वळवला. नेटकऱ्यांनी आपआपल्या पद्धतीने या बाबाला सुनावलंय. नेटकऱ्यांनी ज्या पद्धतीने या बाबाला सुनावलंय, ते पाहून तो पुन्हा असं धाडस करेल, असं वाटत नाही.
दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानला 49.4 ओव्हरमध्ये 241 धावांवर रोखलं. त्यामुळे भारताला विजयासाठी 242 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान विराट कोहली याचं नाबाद शतक आणि श्रेयस अय्यर याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. भारताने 42.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 244 धावा केल्या. भारताचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.
आयआयटी बाबाची भविष्यवाणी
Agar aaj iss IIT baba ki baat sach hui to main jaa raha firr to inse milne🙌🏻
All eyes on King Kohli👑#INDvsPAK pic.twitter.com/CjEFPybBhR
— Ritesh Sharma (@delphic_RS) February 23, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.