यूएई : दुबईत 13 जानेवारीपासून इंटरनॅशनल क्रिकेट टी 20 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील दुसरा सामना 14 जानेवारीला पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्सच्या मालकीची असलेल्या एमआय एमिरेट्स विरुद्ध शारजाह वॉरियर्स यांच्याच खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडिन्यसने शारजाहवर 49 धावांनी दमदार विजय मिळवला.
मुंबईने पहिले बॅटिंग करताना 5 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 204 धावांचा उभा केला. मात्र शारजाह वॉरियर्सला 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 155 धावाच करता आल्या. यासह मुंबईने या स्पर्धेतील विजयी सुरुवात केली.
शारजाह वॉरियर्सने टॉस जिंकला. शारजाहच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. मुंबईचा सलामी फलंदाज विल समीद 2 धावा करुन तंबूत परतला. यानंतर मुहम्मद वसीम आणि आंद्रे फ्लेचरने मुंबईचा डाव सावरत जोरदार फटकेबाजी केली. आंद्रेने 22 धावा केल्या. यानंतर मैदानात सिक्सचा महापूर आला.
निकोलस पूरनने फटकेबाजी करायला सुरुवात केली. वसीमने शानदार अर्धशतक केलं. त्यानंतर वसीम 39 बॉलमध्ये 5 खणखणीत सिक्स आणि तेवढेच चौकार लगावले. वसीमने एकूण 71 धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर त्याने मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर किरॉन पोलार्डने फिनिशिंग टच दिला. पोलार्डने 13 बॉलमध्ये 1 फोर आणि 2 गगनचुंबी सिक्स ठोकत निर्णायक 22 धावा केल्या.
त्यानंतर ड्वेन ब्राव्होने 10 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 सिक्स ठोकून 21 धावांची नाबाद खेळी केली. अशा प्रकारे मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 204 धावांचा डोंगर उभा केला.
शारजाहचे फलंदाज 205 धावांच्या विजयी लक्ष्याचं पाठलाग करायला मैदानात आले. मात्र शारजाहने ठराविक अंतराने विकेट्स गमावले. सलामी फलंदाज रहमानुल्लाह गुरबाजने 43 धावांची वेगवान खेळी केली. तर क्रिस वोक्सने मैदानात येताच टॉप गिअर टाकला.
वोक्सने 29 बॉलमध्ये 69 धावा ठोकल्या. मात्र शारजाहला विजय मिळवून देता आला नाही. शारजाहला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 155 धावाच करता आल्या. मुंबईकडून इमरान ताहिरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर फजलहक फारुखी आणि ड्वेन ब्राव्हो या जोडीने प्रत्येकी 2 विके्टस मिळवल्या.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : किरॉन पोलार्ड (कॅप्टन), मुहम्मद वसीम, विल स्मीड, आंद्रे फ्लेचर, निकोलस पूरन (विकेटकीपर), नजीबुल्ला झाद्रान, ड्वेन ब्राव्हो, फजलहक फारुकी, झहूर खान, ट्रेंट बोल्ट आणि इम्रान ताहीर.
शारजाह प्लेइंग इलेव्हन : मोईन अली (कॅप्टन), एविन लुईस, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), डेविड मलान, जो डेन्ली, टॉम कोहलर-कॅडमोर, मोहम्मद नबी, ख्रिस वोक्स, कार्तिक मयप्पन, जुनैद सिद्दीक आणि नवीन-उल-हक.