IND vs BAN: हार्दिकच्याच अर्धशतकानंतर कॅप्टन रोहित असं का म्हणाला?

| Updated on: Jun 23, 2024 | 2:05 AM

Rohit Sharma IND vs BAN: रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची टी 20 वर्ल्ड कपमध्ये जोरदार कामगिरी सुरु आहे. रोहितने बांगलादेश विरुद्ध विजय मिळवल्यानंतर काय म्हटलं?

IND vs BAN: हार्दिकच्याच अर्धशतकानंतर कॅप्टन रोहित असं का म्हणाला?
Rohit sharma on hardik pandya
Follow us on

टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील आपल्या सुपर 8 मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात शेजारी बांगलादेशवर 50 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाचा हा सुपर 8 मधील दुसरा आणि आणि एकूण सलग पाचवा विजय ठरला. टीम इंडियाने टॉस गमावून उपकर्णधार हार्दिक पंड्या याच्या नाबाद 50 धावांच्या मदतीने 196 धावा केल्या. बांगलादेशला प्रत्युत्तरात 8 विकेट्स गमावून 146 धावांपर्यंतच मजल मारता आली. अशाप्रकारे टीम इंडियाने विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयानंतर टी20 क्रिकेटमध्ये अर्धशतकं आणि शतकांची गरज नाही, असं कॅप्टन रोहित म्हणाला. कॅप्टन रोहित हार्दिकच्या अर्धशतकानंतरच असं का म्हणाला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोहित नक्की काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

रोहितने काय म्हटलं?

“आम्ही बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही आघाड्यावंर शानदार कामगिरी केली. 8 फलंदाजांनी आपली भूमिका बजावणं फारच महत्त्वाचं आहे. मग ते काहीही असो. आमच्यातील एकाने (हार्दिकला उद्देशून) अर्धशतकी खेळी केली आणि आम्ही 197 धावापर्यंत गेलो.टी20 मध्ये फिफ्टी आणि सेंच्युरीची गरज नाही, असं मला वाटतं. तुम्ही बॉलर्सवर किती प्रेशर तयार करता हे महत्त्वाचं आहे”, असं रोहित म्हणाला.

हार्दिकबाबत काय म्हणाला?

रोहितने हार्दिकबाबत गेल्या प्रतिक्रियेचा पुनरोच्चार करत म्हटलं की, “मी गेल्या मॅचमध्येही म्हणालेलो की हार्दिक बॅटिंग करुन चांगल्या स्थितीत आणतो. पहिले 5-6 बॅट्समन चांगले खेळल्यानंतर हार्दिक आपल्या हिशोबाने खेळतो. हार्दिक हार्दिक आहे. तो किती क्षमतावान आहे, हे आपल्याला माहितीय. हार्दिकची कामगिरी अशीच राहिली तर आम्ही चांगल्या स्थितीत असू”, असं रोहितने म्हटलं.

दरम्यान रोहितने अर्धशतक आणि शतकाबाबत दिलेल्या प्रतिक्रियेचा हार्दिकच्या फिफ्टीशी संबंध नाही. मात्र रोहितने दिलेली प्रतिक्रिया हार्दिकच्या फिफ्टीनंतरच का दिली, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. टीम इंडियाकडून हार्दिकआधी गेल्या 2 सामन्यात सूर्यकुमार यादव याने सलग 2 अर्धशतकं ठोकली आहेत.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, शकीब अल हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेदी हसन, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.