मुंबई : वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व केएल राहुलकडे सोपवण्यात आलं आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी होत आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार केएल राहुल याने पत्रकारांशी संवाद साधला. तसेच वनडे सामन्यासाठी काय रणनिती असेल याबाबत दिलखुलासपणे सांगितलं. इतकंच काय तर कर्णधार केएल राहुल याने क्रीडाप्रेमींना एक आनंदाची बातमी देखील दिली आहे. या सामन्यात रिंकू सिंह आणि संजू सॅमसन संधी मिळणार आहे. पत्रकार परिषदेत केएल राहुल याने याबाबतचा खुलासा केला आहे. त्याचबरोबर कोणत्या स्थानावर खेळेल याबाबतचा खुलासा देखील केला आहे. रिंकू सिंह याचा पदार्पणाचा वनडे सामना असणार आहे. या सामन्यात रिंकू सिंह कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.
केएल राहुल याने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “संजू सॅमसन आणि रिंकू सिंह या दोघांना संधी मिळेल. संजू सॅमसन वनडे मालिकेत खेळणार आणि पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर उतरणार. दुसरीकडे, रिंकू सिंह याला वनडे फॉर्मेटमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळेल.” रिंकू सिंह याने टी20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. आता वनडे क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी कशी असेल याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
केएल राहुलने स्वत:च्या भूमिकेबाबतही पत्रकार परिषदेत सांगितलं. “वनडे मालिकेत मधल्या फळीत फलंदाजी करेल. तसेच विकेटकीपिंगची भूमिका बजावेल.” संजू सॅमसनही विकेटकिपींग करतो, पण ही जबाबदारी कर्णधार केएल राहुलने स्वत:कडे ठेवली आहे. तसेच कसोटी सामन्यात कोणतीही भूमिका बजावण्यास सज्ज असल्याचं सांगितलं आहे. मॅनेजमेंट आणि कर्णधार जी भूमिका देतील ती बजावण्यास सज्ज असल्याचं त्याने सांगितलं.
रजत पाटिदार, रिंकू सिंह,ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन, आकाश दीप, अर्शदीप सिंग, आवेश खान, दीपक चाहर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, युजवेंद्र चहल.