नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) भारताच्या नितीन मेनन (Nitin Menon) यांना ICC एलिट पॅनलमध्ये (ICC Elite Panel) कायम ठेवलं आहे. मेनन हे या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत तटस्थ पंच म्हणून पदार्पण करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका अधिकाऱ्यानं सांगितले की, आयसीसीनं एलिट पॅनलमधील मेनन यांचा कार्यकाळ एक वर्षानं वाढवला आहे. एलिट पॅनेलच्या 11 सदस्यांमध्ये इंदूरचे 38 वर्षीय मेनन हे एकमेव भारतीय आहेत. आयसीसीनं अलीकडेच मेनन यांचा कार्यकाळ एक वर्षानं वाढवला आहे, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. गेली तीन-चार वर्षे ते मुख्य पंच आहेत. या महिन्याच्या अखेरीस चे तटस्थ पंच म्हणून पदार्पण करेल. मेनन यांचा 2020 मध्ये कोरोनाच्या सुरुवातीला एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता. व्यंकटरघवन आणि एस. रवीनंतर एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट होणारे ते तिसरे भारतीय ठरले आहे.
आयसीसीनं प्रवासी निर्बंधांमुळे स्थानिक पंचांना घरच्या मालिकेतील सामन्यांमध्ये काम करण्याची परवानगी दिल्यानंतरच मेनन भारतात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये काम करू शकले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, आयसीसीने एलिट पॅनेलमधील मेनन यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला आहे. एलिट पॅनेलच्या 11 सदस्यांमध्ये इंदूरचे 38 वर्षीय मेनन हे एकमेव भारतीय आहेत. आयसीसीने अलीकडेच मेनन यांचा कार्यकाळ एक वर्षानं वाढवला आहे, असं अधिकाऱ्यानं सांगितलंय. गेली 3-4 वर्षे ते आमचे मुख्य पंच आहेत. या महिन्याच्या अखेरीस तो तटस्थ पंच म्हणून पदार्पण करेल, असंही अधिकारी म्हणाला.
मेनन यांचा 2020 मध्ये कोविड-19 महामारीच्या सुरुवातीला एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता. एस वेंकटराघवन आणि एस रवी यांच्यानंतर एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट होणारा तो तिसरा भारतीय पंच बनला. आयसीसीने प्रवासी निर्बंधांमुळे स्थानिक पंचांना घरच्या मालिकेतील सामन्यांमध्ये काम करण्याची परवानगी दिल्यानंतर मेनन मात्र भारतात केवळ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येच काम करू शकला.