आयपीएल मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये सुरु आहे. या लिलावात पहिलं नाव अर्शदीप सिंगचं आलं.पंजाब किंग्सने अर्शदीप सिंगला रिलीज केलं होतं. त्यामुळे त्याच्यासाठी पहिल्या सेटमध्येच बोली लागली. बेस प्राईस 2 कोटींपासून बोली लागण्यास सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बोली सुरु झाली. ठरावीक किंमतीपर्यंत पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने बोली सोडून दिली. त्यानंतर दिल्ली आणि गुजरात टायटन्स यांच्यात चढाओढ सुरु झाली.दिल्ली कॅपिटल्सने 10.75 कोटीपर्यंत बोली लावली आणि गुजरात टायटन्स या लिलावातून बाहेर पडली. पण राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादने बोली लावण्यास सुरुवात केली आणि दिल्ली कॅपिटल्स आऊट झाली.
सनरायझर्स हैदराबादने सर्वात मोठी बोली लावली. 15 कोटी 75 लाखांची बोली अर्शदीप सिंगला आपल्याकडे ओढलं. पण पंजाब किंग्स आपल्याकडे मोठी पर्स घेऊन बसली होती. त्यामुळे त्याला सहजासहजी सोडणार नव्हतं. मग काय आरटीएम कार्ड वापरलं आणि 18 कोटींची बोली लावली. अर्शदीप सिंगला 18 कोटी मिळाले आणि पंजाब किंग्ससोबत राहिला.
अर्शदीप सिंगने 2019 आयपीएलमधून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. अर्शदीप 65 आयपीएल सामने खेळला आहे. यात 1364 चेंडू टाकले असून 2052 धावा दिल्या आहेत. तसेच 76 विकेट घेतल्या आहेत. 32 धावांवर 5 विकेट ही सर्वोत्तम खेळी आहे. त्याचा इकोनॉमी रेट 9.03 आहे. दरम्यान फलंदाजीत 12 डावात खेळला आहे. त्याने एकूण 29 धावा केल्या असून 10 ही सर्वोत्तम खेळी आहे.