मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया कप स्पर्धेत खेळत असलेले सर्व खेळाडू या संघात आहेत. फक्त तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना डावलण्यात आलं आहे. खेळाडूंच्या नावाची घोषणा केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले. यावेळी पत्रकारांनी टीम निवडीबाबत काही प्रश्न विचारले. तेव्हा रोहित आणि अजित आगरकर यांनी त्यांनी उत्तरं दिली. पण एका प्रश्नामुळे रोहित शर्मा चांगलाच संतापला. तसेच पत्रकारांना कडक शब्दात ताकीद दिली. असा प्रश्न पुन्हा विचारू नका असं त्याने स्पष्टपणे सांगितलं.
पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा याला ड्रेसिंग रुममधील वातावरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. ड्रेसिंग रुममधून बाहेर ज्या बातम्या येतात त्याबद्दल तुझं काय मत आहे? यावर रोहित शर्मा चांगलाच संतापला. त्याने स्पष्टच सांगितलं की असा प्रश्न पुन्हा विचारू नका आणि विचारला तरी त्याचं उत्तर देणार नाही.
“मी आधीही सांगितलं आहे की, टीममधील खेळाडूंवर याचा काहीही परिणाम होत नाही. सर्व खेळाडूंनी हे पाहिलं आहे. जेव्हा भारतात वर्ल्डकप दरम्यान पत्रकार परिषद करेल तेव्हा ड्रेसिंग रुममधील वातावरणाबाबत विचारू नका. त्याचं उत्तर देणार नाही.याला काहीच अर्थ नाही. आमचं लक्ष्य दुसरीकडे आहे आणि आम्ही एक संघ म्हणून त्याकडे फोकस करत आहोत.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं.
Rohit sharma in press conference 🔥🔥🔥#Worldcup2023 pic.twitter.com/hJmt6rjQRd
— Awadhesh Mishra (@annnnshull) September 5, 2023
“आम्ही सर्वोत्तम खेळाडू निवडण्याचा प्रयत्न केला आहे. काही खेळाडूंना संधी मिळाली नाही आणि असंच होतं. ते निराश होतील. मी यातून गेलो आहे. त्यामुळे आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं. 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा याची संघात निवड झाली नव्हती.
वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव