मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सामन्यात आज सुरु असलेल्या गुजरात विरुद्धच्या (GT) सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) गुजरात टायटन्ससमोर 178 धावांचं लक्ष्य ठेवलंय. नाणेफेक हल्यानंतर पहिले फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्यानं इशान किशनसोबत 74 धावांची सलामीची भागीदारी केली. मात्र, रोहितचं अर्धशतक हुकलं. रोहित 28 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 43 धावा करून बाद झाला. रोहित शर्मानं आजच्या सामन्यात सलामीला येत आक्रमक खेळी केली. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार लगावत 28 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. त्याच्या या धावसंख्येचा मुंबईला चांगलाच फायदा देखील झाला. रोहितने आजच्या सामन्यात एकूण दोन षटकार लगावले आहे. हे षटकार लगावताच त्याने एकट्या मुंबई संघाकडून खेळताना 200 षटकार लगावण्याचा विक्रम केलाय. मुंबईकडून खेळताना त्याच्या नावावर आता 201 षटकार आहेत.
??????? ?????? ? 2️⃣0️⃣0️⃣ – A धमाकेदार connection! ?@ImRo45 has now hit 200 sixes for #MumbaiIndians ?#OneFamily #DilKholKe #GTvMI pic.twitter.com/kPYhYRWM4H
— Mumbai Indians (@mipaltan) May 6, 2022
सूर्यकुमार यादव फार काही करू शकला नाही आणि 11 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. यानंतर ईशान किशननेही काही मोठे फटके मारले. तो 29 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. ईशाननं 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. किरॉन पोलार्ड पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला 14 चेंडूत चार धावा करता आल्या. त्याला राशिद खाननं क्लीन बोल्ड केलं. टिळक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी मुंबईचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी रचली. मात्र, 19व्या षटकात मुंबईला दोन धक्के बसले. या षटकात टिळक वर्मा धावबाद झाला. त्यानं 16 चेंडूत 21 धावा काढल्या. यानंतर लॉकी फर्ग्युसनने त्याच षटकात डॅनियल सॅम्सला राशिद खानकरवी झेलबाद केलं. टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात 13 धावा देत मुंबईला 6 बाद 177 धावांपर्यंत नेलं. डेव्हिड 21 चेंडूत 44 धावा करून नाबाद राहिला. गुजरातकडून राशिदने दोन बळी घेतले. त्याचवेळी अल्झारी जोसेफ, फर्ग्युसन आणि प्रदीप संगवान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अशा प्रकारे मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससमोर 178 धावांचं लक्ष्य ठेवलंय.
गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, ऋदिमान साहा, साई सुदर्शन/अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ, प्रदीप सांगवान/यश दयाल, लॉकी फर्ग्युसन,
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, टिम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह