मोहाली | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी 20 सामना आज 11 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. सामन्याला अवघ्या काही वेळेस सुरुवात होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. सामन्याचं आयोजन हे मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या पहिल्याच सामन्यावर मोठं संकट आहे. सामन्यावर पावसाची नाही, तर दुसऱ्याची गोष्टीची टांगती तलवार आहे.
मोहालीत कडाक्याची थंड आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड हे बुधवारी पत्रकार परिषदेदरम्यान कानटोपी घालून उपस्थित होते. तसेच मैदानात टीम इंडियाच्या खेळाडूंही हातमोजे घालून होते. यावरुन मोहालीत किती थंडी आहे, याचा अंदाज बांधता येतो. मोहालीत किमान तापमान 5-6 डिग्री सेल्सियस असल्याचा अंदाज आहे. तसेच सूर्यास्तानंतर दव पडण्याची शक्यता आहे.
सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. सामना फल्ड लाईटच्या उजेडात होणार आहे. धुक्यांची भूमिका निर्णायक असणार आहे. सामन्यादरम्यान धुक्यांमुळे अनेकदा काही दिसत नाही. त्यामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. तसेच सामना रद्द करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“पीसीए अर्थात पंजाब क्रिकेट असोसिएशन सामन्याचं यजमानपद भूषवतं. दिवसा सामने होतात. सुदैवाने गेल्या 2-3 दिवसात धुक्याचं प्रमाण कमी आहे. दव पडू नये, यासाठी आम्ही मैदानात एका केमिकलचा वापर करणार आहोत.”, अशी माहिती पीच क्युरेटर राकेश कुमार यांनी दिली.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.