मोहाली | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेचा 11 जानेवारीपासून श्री गणेशा होत आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. रोहितने 14 महिन्यांनंतर टी 20 टीममध्ये कमबॅक केलं आहे. त्यामुळे रोहित टी 20 मध्ये कशाप्रकारे नेतृत्व करतो, हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.
अफगाणिस्तान आणि टीम इंडिया आतापर्यंत एकूण 5 टी 20 सामने झाले आहेत. या 5 पैकी 4 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. तर 1 सामना हा बरोबरीत राहिला. मात्र त्यानंतरही टीम इंडिया अफगाणिस्तानला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. अफगाणिस्तान टीममध्ये अनेक खेळाडू हे गेमचेंजर आहेत. हे खेळाडू कधीही खेळ बदलण्याची क्षमता ठेवतात. पहिल्या टी 20 सामन्यात या खेळाडूंवर लक्ष असणार आहे.
रोहित शर्माची टी 20 टीममध्ये 14 महिन्यांनी एन्ट्री झाली. रोहितकडेच टीम इंडियाची कॅपट्न्सी आहे. तसेच विराटने वैयक्तिक कारणामुळे पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे रोहितसोबत यशस्वी ओपनिंग करणार आहे. यशस्वीने गेल्या काही टी 20 सामन्यांमध्ये विस्फोटक खेळी केली आहे. आता अफगाणिस्तान विरुद्धही त्याने तसंच खेळावं, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
अफगाणिस्तानची सूत्र ही इब्राहीम झद्रान याच्या हाती आहेत. इब्राहीमचे टी 20 मधील आकडे जबरदस्त आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर इब्राहीमला गुंडाळण्याचं आव्हान असणार आहे. तसेच अझमतुल्लाह उमरझई ऑलराउंडर आहे. अझमतुल्लाहने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये बॅटिंग आणि बॉलिंगने प्रभावित केलं. त्यामुळे या दोघांना रोखण्याचं आव्हान रोहितसेनेसमोर असणार आहे.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.