बंगळुरु | टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्यात टॉस जिंकला. टीम इंडियाने मालिका जिंकल्याने प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले. त्यानुसार जितेश शर्मा, अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल या तिघांना बाहेर ठेवलं. तर संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि आवेश खान या तिघांना संधी दिली. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाची बिकट स्थिती झाली आहे. टीम इंडियाने पावर प्लेमधील पहिल्या 5 ओव्हरआधीच 4 विकेट्स गमावल्या आहेत.
अफगाणिस्तानने सलग 2 सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात दोरदार कमबॅक केलंय. अफगाणिस्तानने टीम इंडियाला अवघ्या 22 धावांवर 4 झटके देत बॅकफुटवर ढकललं आहे. विराट कोहली आणि संजू सॅमसन या दोघांना तर भोपळाही फोडता आला नाही. तर यशस्वी आणि शिवम या दोघांना अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. टीम इंडियाने अवघ्या 4 धावांच्या मोबदल्यात या 4 धावा गमावल्या.
फरीद अहमद याने टीम इंडियाला सलग 2 झटके दिले. फरीदने यशस्वी जयस्वालच्या रुपात टीम इंडियाला पहिला झटका दिला. यशस्वी 4 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर विराट कोहली कॅच आऊट झाला. विराटने पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. इथेच विराट फसला आणि तो कॅच आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची 2.4 ओव्हरमध्ये 18-0 वरुन 18-2 अशी स्थिती झाली. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या ओव्हरमध्ये शिवम दुबे आणि संजू सॅमसन दोघे आऊट झाले.
शिवम दुबेला अझमतुल्लाहने आपल्या बॉलिंगवर चलाखीने विकेटकीपरच्या हाती कॅच आऊट केलं. शिवम 1 धाव करुन माघारी परतला. तर संजू सॅमसन पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात झिरोवर आऊट झाला.अर्थात संजू आणि विराट गोल्डन डकचे मानकरी ठरले.
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.