Video | अफगाणिस्तानविरूद्धच्या मॅचआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी, खेळाडूंना भरली हुडहुडी, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jan 11, 2024 | 2:00 PM

IND vs AGF 1st t20 : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील पहिला टी-20 सामना आज होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची थंडीने अवघड परिस्थिती झाली. बीसीसीआयने व्हिडीओ व्हायरल केला आहे.

Video | अफगाणिस्तानविरूद्धच्या मॅचआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी, खेळाडूंना भरली हुडहुडी, व्हिडीओ व्हायरल
Team India Scared Due to cold bcci viral video
Follow us on

मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील टी-20 मालिका आजपासून सुरू होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप आधी टीम इंडिया एकमेव टी-20 मालिका खेळणार आहे. पहिला सामना आज संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होणार आहे. या सामन्याआधी बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की टीम इंडियाचे खेळाडू गारठले आहेत.

पाहा व्हिडीओ-:

 

टीम इंडियाचे खेळाडू सरावासाठी आले तेव्हा भयानक थंडी होती. थंडीमुळे खेळाडूंनी टोप्या, हातमोजे आणि स्वेटर घातले होते. मात्र थंडीच इतकी होती की खेळाडूंच्या तोंडातून वाफा निघत होत्या. रिंकू सिंह म्हणाला की, मी नुकताच केरळमध्ये रणजी क्रिकेट खेळून आलो आहे. तिथे मे किंवा जून महिन्यासारखी गरमी होती. शिवन दुबे म्हटला की, यी सीझनमध्ये खेळणं मोठं आव्हान असणार आहे.

व्हिडिओमध्ये अक्षर पटेल किती डिग्री आहे असे विचारत आहे. यानंतर अर्शदीप सिंहने गंमतीत सांगितले की, खूप गरम वाटत आहे. थोडी थंडी पडली असती तर बरं झालं असतं. खेळाडू पहिल्या सामन्याआधी चांगलेच गारठलेले पाहायला मिळाले.

पहिला सामना किती वाजता आणि कुठे?

टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील पहिला टी-20 सामना मोहालीमधील पंजाब क्रिकेट असोसिएशन IS बिंद्रा स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होणार आहे. तर संध्याकाळी सात वाजता टॉस असणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.