मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सोपा वाटणारा अफगाणिस्तानचा पेपर जरा कठीण निघाला असं म्हणावं लागेल. कारण सुरुवातीचे 3 गडी बाद झाल्यानंतर धावांच्या गतीवर लगाम लावली जाईल असं वाटलं होतं. पण चौथ्या गड्यासाठी हशमातुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह ओमरझाई यांनी चांगलंच झुंजवलं. चौथ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. तसेच भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. अफगाणिस्तानचा संघ गोलंदाजीत उजवा असल्याने त्यांनी प्रथम फलंदाजी करणं निवडलं. त्यामुळे मोठी धावसंख्या भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरणार आहे. या बाबतची स्पष्ट चिंता भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसत होती. चौथ्या गड्यासाठी जमलेली भागीदारी फोडण्याचं मोठं आव्हान होतं.पण काही केल्या यश मिळत नव्हतं. अखेर हार्दिक पांड्याला 35 व्या षटकात यश मिळालं आणि त्याने आक्रमक सेलिब्रेशन केलं.
भारताला पहिला विकेट जसप्रीत बुमराह याने मिळवून दिला. सातव्या षटकात इब्राहिम झाद्रन याला तंबूत पाठवलं. हार्दिक पांड्याने रहमनुल्लाह गुरबाज याला 13 षटकात बाद केलं. तसेच लॉर्ड शार्दुल ठाकुर याने रहमत शाह याला 14 षटकात तंबूचा रस्ता दाखवला. पण त्यानंतर चौख्या गड्यासाठी 20 षटकं वाट पाहावी लागली. चौथ्या गड्यासाठी हशमतुल्लाह शाहिती आणि अझमतुल्लाह ओमरझाई यांनी 121 धावांची भागीदारी केली.
Man Of Crisis – Birthday Boy Hardik Pandya On Fire 🔥#INDvAFG | #CWC23 | pic.twitter.com/aFPLKZMR2l
— ♔ (@balltamperrerrr) October 11, 2023
रोहित शर्मा याने 35 वं षटक हार्दिक पांड्या याला सोपवलं. पण पहिल्याच चेंडूवर झमतुल्लाह ओमरझाई याने चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर झमतुल्लाह ओमरझाई याची विकेट मिळाली आणि हार्दिक पांड्या आक्रमक सेलिब्रेशन करत आनंद व्यक्त केला. विकेटसाठी भारतीय गोलंदाजांची किती दमछाक झाली यावरून दिसून येते.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.