मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील नववा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात सुरु आहे. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करणं स्वीकारलं आहे. अपेक्षेप्रमाणे अफगाणिस्तानच्या संघाने सुरुवात केली आहे. विकेट घेण्यासाठी भारतीय गोलंदाजीची धडपड पाहून यावरून अंदाज बांधला जात आहे. पाटा विकेट असल्यामुळे या खेळपट्टीवर मोठ्या धावसंख्येचा अंदाज आहे. दरम्यान भारताकडून पहिली विकेट घेण्यात वेगवाग गोलंदाज जसप्रीत बुमराह याला यश आलं. इब्राहिम झारदान याला 22 धावांवर असताना जसप्रीत बुमराह याने बाद केलं. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर केएल राहुल याने झेल घेतला.
कर्णधार रोहित शर्मा याने सातवं षटक जसप्रीत बुमराह याच्या हाती सोपवलं. बिनबाद 32 धावा अशी अफगाणिस्तानची स्थिती होती. यावेळी जसप्रीत बुमराहने चेंडू हाती घेतला आणि विकेटसाठी प्रयत्न सुरु केला. पण पहिल्याच चेंडूवर चौकार आला. त्यानंतर दुसरा आणि तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलं. पण चौथ्या चेंडूवर इब्राहिम झाद्रन याची विकेट मिळवण्यात यश आलं. पण हे इतक्यावरच थांबलं नाही. जसप्रीत बुमराह याने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं.
Jasprit bumrah hits the Marcus Rashford celebration after getting wicket.#INDvsAFG pic.twitter.com/PIPWc7BOGV
— ° (@imGurjar_) October 11, 2023
ICC's poster on Jasprit Bumrah and Marcus Rashford's celebrations. pic.twitter.com/liRi2uagW1
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 11, 2023
Jasprit Bumrah 🤝 Marcus Rashford #CWC23 pic.twitter.com/jSagNhx7ES
— Premier League India (@PLforIndia) October 11, 2023
Jasprit Bumrah recreated marcus rashford's celebration!!#INDvsAFG pic.twitter.com/q00EdCMlU9
— ᴘʀᴀᴛʜᴍᴇsʜ⁴⁵ (@45Fan_Prathmesh) October 11, 2023
जसप्रीत बुमराह याची ही स्टाईल मँचेस्टर युनाइटेड लिजेंड मार्कस रशोफोर्ड याच्या मिळतीजुळती आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. झाद्रनला बाद केल्यानंतर बुमराहने उजव्या हाताचं बोट कपाळाजवळ नेलं आणि स्क्रू फिरवतात तसा फिरवलं. आता यावर काही मीम्सही व्हायरल होत आहेत.
Jethalal celebration by Jasprit Bumrah.#INDvsAFG #NaveenUlHaq #CWC23 #WorldCup2023 #WorldCup #INDvsPAK #PAKvIND #ViratKohli𓃵 #INDvsAFG #AFGvIND #ShubmanGill #naveenulhaq #JaspritBumrah pic.twitter.com/L8sLQ6QFrQ
— Sports Glory (@Sportsglory01) October 11, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.