Video : ऋषभ पंतने 18 मीटर धावत पकडला जबरदस्त झेल, पण तरीही रोहितने चांगलंच फटकारलं

| Updated on: Jun 21, 2024 | 3:51 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. साखळी फेरीनंतर सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे.अफगाणिस्तानलाला 47 धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे. या सामन्यात विकेटकीपर ऋषभ पंतने जबरदस्त झेल पकडला. मात्र तरीही रोहित शर्माने त्याला चांगलंच फटकारलं.

Video : ऋषभ पंतने 18 मीटर धावत पकडला जबरदस्त झेल, पण तरीही रोहितने चांगलंच फटकारलं
Follow us on

सुपर 8 फेरीतील भारताचा पहिलाच सामना अफगाणिस्तानशी झाला. या सामन्यात भारताने 8 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान ठेवलं. पण अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 20 षटकात 8 गडी गमवून 134 धावा करू शकला. भारताने हा सामना 47 धावांनी जिंकला.भारताने या सामन्यात गोलंदाजी असो की फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण सर्वच ठिकाणी आपलं सर्वोत्तम प्रदर्शन केलं. मात्र एका ठिकाणी कर्णधार रोहित शर्मा विकेटकीपर ऋषभ पंतवर वैतागलेला दिसला. त्याचं झालं असं की, कुलदीप यादवच्या चेंडूवर गुलबदीन नईबने उत्तुंग फटका मारला. चेंडू खूपच वर चढला होता. हा झेल पकडण्यासाठी ऋषभ पंतने 18 मीटर लांब धाव घेतली आणि पकडला. पण समोर उभ्या असलेल्या कर्णधार रोहित शर्माने या विकेटसाठी सेलिब्रेशन करण्याऐवजी त्याला लांब उभं राहण्यास सांगितलं.

अफगाणिस्तानचे पॉवरप्लेमध्येच तीन महत्त्वाचे विकेट पडले होते. त्यानंतर गुलबदीन नईब आणि अझमतुल्लाह ओमरजई यांनी चौथ्या विकेटसाठी डाव सावरला होता. कुलदीप यादव टाकत असलेल्या 11 व्या षटकात नईबने वेगाने धावा करण्याच्या विचारात जोरदार प्रहार केला. पण चेंडू काही पट्ट्यात बसला नाही आणि खूप वर चढला. यावेळी विकेटकीपर ऋषभ पंतने कॉल देत धाव घेतली आणि अप्रतिम झेल पकडला. यावेळी रोहित शर्माने आनंद व्यक्त करण्याऐवजी रागवला. कारण हा झेल रोहितचा होता. रोहित शर्मा तिथे आधीपासूनच उभा होता. पंतने कॉल दिल्याने तो थांबला आणि झेल घेतल्यानंतर त्याला जागच्या जागी सुनावलं.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऋषभ पंत चांगल्याच फॉर्मात आहे. फलंदाजी आणि विकेटकीपिंग या दोन्ही क्षेत्रात कमाल करत आहे. फिल्डिंग कोच टी दिलीपने त्याच्या या कामगिरीचं कौतुकही केलं आहे. ऋषभ पंतने अफगाणिस्तानविरुद्ध तीन झेल पकडले. या स्पर्धेत ऋषभ पंतच्या नावावर एकूण 10 झेल झाले आहेत. यासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त झेल घेणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी या रेकॉर्ड संयुक्तपणे एडम गिलख्रिस्टच, मॅथ्यू वेड, जोस बटलर, स्कॉट एडवर्ड्स आणि दासुन शनाका यांच्या नावावर होता.