नवी दिल्ली | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये इतिहास रचला आहे. रोहित शर्मा याने अफगाणिस्तान विरुद्ध आधी 30 बॉलमध्ये वेगवान अर्धशतक ठोकलं. त्यानंतर रोहितने सिक्स ठोकत ख्रिस गेल याला सर्वाधिक षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. तसेच रोहितने अर्धशतकानंतर अवघ्या 33 बॉलमध्ये पुढील 50 धावा करत शतक पूर्ण केलं. रोहितने 63 बॉलमध्ये शतक ठोकलं. रोहितने या शतकासह मोठा कीर्तीमान रचला आहे.
रोहितंच वनडे कारकीर्दीतील हे 31 वं शतक ठरलं. रोहितचं हे वर्ल्ड कपमधील एकूण सातवं शतक ठरलं. रोहित यासह वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. रोहितने वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून वेगवान शतक ठोकण्याबाबत दिग्गज माजी कर्णधार कपिल देव यांचा 40 वर्षांपू्र्वींचा विक्रम मोडीत काढला. कपिल देव यांनी 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये झिंबाब्वे विरुद्ध 72 चेंडूत शतक ठोकलं होतं. रोहितने या शतकी खेळीत 4 सिक्स आणि 12 चौकार ठोकले.तसेच रोहितने 158.73 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं.
रोहितने अवघ्या 19 डावांमध्ये 7 शतकं पूर्ण केली आहेत. तर सचिन तेंडुलकरने 44 डावांमध्ये 6 शतकं लगावली होती. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंग याने 42 इनिंग्समध्ये 5 शतकं झळकावली. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याने 35 इनिंग्समध्ये 5 सेंच्युरी केल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर याने 19 डावांमध्ये 4 शतकं केली आहेत.
दरम्यान रोहित शर्मा अफगाणिस्तान विरुद्ध 131 धावा करुन आऊट झाला. रोहितने 84 बॉलमध्ये 16 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 131 धावांची झंझावाती खेळी केली.
रो हिट तडाखा
1⃣3⃣1⃣ runs
8⃣4⃣ deliveries
1⃣6⃣ fours
5⃣ sixesEnd of a spectacular knock from #TeamIndia Captain Rohit Sharma! 👏👏#CWC23 | #INDvAFG | #MeninBlue pic.twitter.com/4MdeFmd56Y
— BCCI (@BCCI) October 11, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.