IND vs AFG : आयसीसीच्या नव्या नियमानंतर रोहित शर्माला पहिली वॉर्निंग, मुकेश कुमारला षटक सोपताना केली अशी चूक

| Updated on: Jan 11, 2024 | 8:34 PM

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत सुरु असून रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण 14 महिन्यांच्या कालावधीनंतर परतलेल्या रोहित शर्माला नव्या नियमाचा दणका बसला. पण फक्त वॉर्निंग देऊन सोडून देण्यात आलं.

IND vs AFG : आयसीसीच्या नव्या नियमानंतर रोहित शर्माला पहिली वॉर्निंग, मुकेश कुमारला षटक सोपताना केली अशी चूक
IND vs AFG : रोहित शर्माच्या कर्णधारपदाला डाग लागता लागता वाचला, मुकेश कुमारला षटक सोपवताना आयसीसी नियमांचं झालं उल्लंघन
Follow us on

मुंबई : भारत अफगाणिस्तान यांच्यात पहिला टी20 सामना सुरु असून 159 विजयासाठी धावांचं आव्हान मिळालं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात आता टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. 14 महिन्यानंतर रोहित शर्मा टी20 सामना खेळत असून कर्णधारपद भूषवत आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा डोळ्यासमोर ठेवूनच रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. पण इतक्या महिन्यांनी परतलेल्या रोहित शर्माला एक चूक चांगलीच महागात पडली असती. ती म्हणजे आयसीसीचा नवा नियमामुळे वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे. रोहित शर्माला संघाचं सोळावं षटक सोपवताना वेळ झाला आणि पंचांनी त्याला वॉर्निंग दिली. ही या सामन्यातील पहिलीच वॉर्निंग होती. तीन चुका केल्या की आयसीसीच्या नियमानुसार टीम इंडियाला फटका बसला असता. पण रोहित शर्मा वेळीच सावध झाला आणि ती चूक पुन्हा होऊ दिली नाही.

रोहित शर्माने संघाचं 15 वं षटक रवि बिश्नोईल याच्याकडे सोपवलं. पण पहिल्या चेंडूपासून अझमतुल्लाह ओमरझाई याने आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर एक धाव घेत मोहम्मद नबीला स्ट्राईक दिली. नबीने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेला आणि सहा चेंडूवर एक धाव आली. 15 व्या षटकात 16 धावा आल्या. त्यामुळे आता 16 षटक कोणाकडे सोपवावं हा पेच निर्माण झाला. यासाठी रोहित शर्माने 60 सेकंदापेक्षा जास्त वेळ घेतला. 64 व्या सेकंदाला मुकेश कुमारकडे षटक सोपवलं. 4 सेकंद उशीर झाल्याचं लक्षात येताच पंचांनी वॉर्निंग दिली.

काय सांगतो आयसीसीचा नियम?

आयसीसीच्या नव्या नियमानुसार मागचं षटक पूर्ण झाल्यानंतर 60 सेकंदात पुढील षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार असला पाहीजे. तीन वेळा जर अशी चूक केली तर 5 धावांचा दंड ठोठावला जाईल. त्यामुळे गोलंदाजांचं प्लानिंग कर्णधारांना षटक सुरु असतानाच करावं लागेल. एक मिनिट गोलंदाज तयार झाला नाही तर पाच धावांचा दंड लागलाच समजा.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, टिळक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान