मुंबई : दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर क्रीडाप्रेमींना वेध लागले आहे ते अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेचे..या मालिकेबाबत क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली कमबॅक करणार का? असाही प्रश्न आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता ताणली गेली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या मालिकेत खेळतील अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेत खेळताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात पाच टी20 सामने झाले आहेत. यापैकी 4 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाला लागलेला नाही. उभय देशांमध्ये ही पहिलीच टी20 मालिका आहे. यापूर्वी दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये आमनेसामने आले आहेत. त्यामुळे ही मालिका दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वाची आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 19 खेळाडूंचीही मालिकेसाठी निवड केली आहे. टी20 सामन्यात राशीद खान याचं पुनरागमन झालं आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मिरवाईस अश्रफ यांनी सांगितलं की, “आम्हाला तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या पहिल्या दौऱ्यावर जाताना आनंद होत आहे. भारत ही जगातील अव्वल रँकिंग असलेली संघ आहे. त्यांच्याविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिका खेळण्याचा आनंद आहे. अफगाणिस्तानचा संघ यापुढे अंडरडॉग राहिलेले नाही. अलीकडच्या उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आम्ही भारताविरुद्ध अत्यंत स्पर्धात्मक मालिकेसाठी उत्सुक आहोत.” विशेष म्हणजे राशीद खानची या मालिकेसाठी निवड झाली असली तर तो एकही सामना खेळणार नाही. नुकतीच त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया पार पडली होती.
🚨 𝐒𝐐𝐔𝐀𝐃 𝐀𝐋𝐄𝐑𝐓! 🚨
AfghanAtalan Lineup revealed for the three-match T20I series against @BCCI. 🤩
More 👉: https://t.co/hMGh4OY0Pf | #AfghanAtalan | #INDvAFG pic.twitter.com/DqBGmpcIh4
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) January 6, 2024
भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ: इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इक्रम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमउल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ , मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशीद खान.