मुंबई | भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ अर्थात बीसीसीआयने मंगळवारी 25 जुलै रोजी टीम इंडियाच्या 2023-24 या हंगामासाठी होम सीरिजची घोषणा केली आहे. त्यानुसार टीम इंडिया एकूण 4 मालिकांमध्ये 16 सामने खेळेणार आहे. या 16 सामन्यांमध्ये 5 कसोटी, 3 वनडे आणि 8 टी 20 सामन्यांचा समावेश आहे. टीम इंडिया 2024 या नववर्षात 3 सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहे. ही मालिका अफगाणिस्तान विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिलीच द्विपक्षीय टी 20 मालिका असणार आहे.
टीम इंडिया 2023-24 या दरम्यान पहली होम सीरिज ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलिया टीम वनडे सीरिजसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान एकूण 3 सामन्यांची वनडे मालिका पार पडणार आहे.
तसेच वनडे वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका पार पडेल. ही मालिका 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान नववर्षात अफगाणिस्तान टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. ही मालिका 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा 11, दुसरा सामना हा 14 तर तिसरा आणि अंतिम सामना हा 17 जानेवारीला पार पडेल. तर यानंतर इंग्लंड टीम भारत दौऱ्यावर येईल. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे.
अफगाणिस्तान आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक
— BCCI (@BCCI) July 25, 2023
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान या टी 20 मालिकेमुळे विराट कोहली आणि नवीन उल हक मैदानात एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हे दोन्ही खेळाडू आयपीएल 16 व्या मोसमात भिडले होते. त्यामुळे आता हे दोन्ही खेळाडू पुन्हा मैदानात एकमेकांविरोधात खेळताना दिसणार आहेत.