Virat Naveen Ul Haq | विराट-नवीन उल हक मॅचनंतर समोरासमोर, पुढे काय केलं?

| Updated on: Oct 11, 2023 | 10:28 PM

Virat Kohli And Naveen Ul Haq Viral Video | विराट आणि नवीन उल हक दोघांमध्येही आयपीएल 16 व्या मोसमात वाजलं होतं. मात्र आता आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया-अफगाणिस्तान सामन्यानंतर विराट-नवीन यांच्यात काय झालं ते व्हीडिओत पाहा.

Virat Naveen Ul Haq | विराट-नवीन उल हक मॅचनंतर समोरासमोर, पुढे काय केलं?
Follow us on

नवी दिल्ली | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेलं 273 धावांचं आव्हान टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या शतकाच्या आणि विराट कोहली याच्या अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केलं. तर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनीही खारीचा वाटा उचलला. रोहित शर्मा याने सर्वाधिक 131 रन्स केल्या. तर विराट कोहली याने नाबाद 55 धावा केल्या. तर श्रेयस नॉट आऊट 25 रन्सवर परतला. तर ईशानने 47 धावांची खेळी केली.

सामन्याआधी, सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतर या सामन्यापेक्षा सर्वाधिक चर्चा होती ती टीम इंडियाच्या विराट कोहली आणि अफगाणिस्तानच्या नवीन उल हक याची. हे दोघेही काही महिन्यापूर्वी आयपीएल 16 व्या मोसमात भिडले होते. या दोघांमध्येही चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर हे दोघेही पहिल्यांदाच आमनेसामने होते. त्यामुळे क्रिकेट चाहतेही या दोघांना एकमेकांसमोर पाहण्यासाठी उतावीळ होते. मात्र सामन्यादरम्यान सामन्यानंतर जे झालं ते सर्वांनीच पाहिलं. तसेच सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि व्हीडिओही व्हायरल झाले.

नवीन विराटला बॉलिंग टाकायला आला. तेव्हा स्टेडियमधील उपस्थित क्रिकेट चाहच्यांनी नवीनला डिवचण्यासाठी विराट-विराट घोषणेने स्टेडियम दणादणून सोडला. मात्र तुम्ही नवीनसोबत असं करु नका, असं आवाहन विराटने हातवाऱ्याने क्रिकेट चाहत्यांना केलं. विराटने या कृतीतून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना हात मिळवला. इतकंच नाही, तर दोघांनी एकमेकांना मीठी मारली. यासोबत या दोघांमधील वादाला पूर्णविराम मिळालं.

विराट-नवीनचं एकमेकांशी हस्तांदोलन आणि घट्ट मीठी

हा विषय इथेच थांबला असंही नाही. टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मैदानात हस्तांदोलनासाठी मैदानात आले. यावेळेसही विराट आणि नवीन या दोघांनी हात मिळवला. विराट आणि नवीन या दोघांचे असंख्य फोटो आणि व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र या दोघांमधील असलेला वाद वर्ल्ड कप निमित्ताने संपला. तसेच क्रिकेटला लेजंड्स गेम का म्हणतात हे पुन्हा विराटने सिद्ध करुन दाखवलं.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.