IND vs AUS : हार्दिक पांड्याची बातच न्यारी, अखेर ‘त्या’ खेळाडूला सलामीला उतरवणारच!

| Updated on: Mar 16, 2023 | 9:35 PM

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पांड्या नेतृत्त्व करताना दिसणार आहे. पांडयाने पत्रकार परिषदेमध्ये शुबमन गिल याच्यासोबत सलामील कोण उतरणार याबाबत खुलासा केला आहे.

IND vs AUS : हार्दिक पांड्याची बातच न्यारी, अखेर त्या खेळाडूला सलामीला उतरवणारच!
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील एकदिवसीय मालिकेला उद्यापासून सुरूवात होत आहे. पहिला सामना मुंबईमध्ये होणार आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या कर्णधारदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर दिली गेली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पांड्या नेतृत्त्व करताना दिसणार आहे. पांडयाने पत्रकार परिषदेमध्ये शुबमन गिल याच्यासोबत सलामील कोण उतरणार याबाबत खुलासा केला आहे.

शुबमन गिलसोबत कोण करणार ओपनिंग?

भारताचा कर्णधार रोहित शर्मा मेहुणा कुणाल सजदेह विवाहबंधनात अडकणार आहे. रितिका सजदेहचा भाऊ मेकअप आर्टिस्ट अनिशा शाहसोबत लग्न करणार आहे. या लग्नासाठी रोहित शर्मा पहिल्या वनडेसाठी उपस्थित नसणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत शुभमन गिल आणि ईशान किशन डावाची सुरूवात करणार असल्याचं हार्दिकने सांगितलं.

हार्दिक पांड्याने यावेळी पिचबाबत बोलताना, दोन्ही संघांना समान संधी असणार आहे. कारण एक वर्षे पिच एकसारखंच असतं कारण सात वर्षे मी इथेच खेळत आहे, असं हार्दिक पांड्या म्हणाला. इतकंच नाहीतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळणार की नाही? यावरही पांड्याने आपलं मत मांडलं आहे.

फायनल सामन्यामध्ये मी खेळणार नाही. कारण त्या संघात मी अजून माझी जागा निर्माण केली नाही. नैतिकदृष्ट्या तसं करणं चुकीचं ठरेल. मी त्या संघात स्थान मिळवण्यासाठई 10 टक्के देखील दिले नसल्याचं पांड्याने म्हटलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईत खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा वनडे सामना 19 मार्चला विशाखापट्टणममध्ये तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 22 मार्चला चेन्नईत खेळवला जाणार आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार – शेवटचे 2 वनडे), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.