मोहाली | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र या सामन्यादरम्यान पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे गेल्या काही मिनिटांपासून खेळ थांबवण्यात आला आहे. खेळ थांबल्याने क्रिकेट चाहत्यांना चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळाली. तर पावसामुळे टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाले. तर ग्राउंड स्टाफने झटपट कव्हरने मैदान झाकलं.
पावसाने सामन्यात दुपारी 4 वाजून 05 मिनिटांनी एन्ट्री घेतली. पाऊस काही वेळ बरसला. बीसीसीआयने ट्विट करत सामना पावसामुळे थांबवण्यात आल्याची माहिती दिली. ग्राउंड स्टाफने कव्हरसने खेळपट्टी आणि मैदानातील आवश्यक तितका भाग झाकला. मात्र त्यानंतर पाऊस थांबला. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि क्रिकेट चाहते आता खेळ सुरु होण्याची वाट पाहत होते. त्यात बीसीसीआयने मोठी आणि दिलासादायक अपडेट दिली.
बीसीसीआयने सामन्याला दुपारी 4 वाजून 20 मिनिटांनी पुन्हा सुरु होणार असल्याचं ट्विटद्वारे कळवलं. मात्र या दरम्यानच्या वेळेत ग्राउंड स्टाफ मैदानात कव्हर काढत होता. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचे गोलंदाज हे बॉलिंग कोचसोबत चर्चा करत होते. पावसामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंना काही वेळ का होईना, विश्रांती मिळाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या 15 मिनिटांच्या वेळेत बॉलिंग कोचकडून काही टीप्स घेतल्या.
बीसीसीआयचं ट्विट
Play to resume at 4.20 PM IST#INDvAUS
— BCCI (@BCCI) September 22, 2023
त्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू ड्रेसिंग रुममधून बाहेर आले. सर्व खेळाडू बाऊंड्री लाईनच्या बाहेर थांबले. त्यानंतर मैदानात प्रवेश केला. हडल टॉकमध्ये पुढील रणनितीबाबत चर्चा केली. त्यानंतर अखेर सामना सुरु झाला.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन) डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरुन ग्रीन, जोस इंग्लिस (विकेटकीपर), मार्क्स स्टोयनिस, एम शॉर्ट, सिन एबोट आणि एडम झॅम्पा.