मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 च्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर आता वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. एकूण 3 सामन्यांची असलेल्या या एकदिवसीय मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होत आहे. सामना मु्ंबईत होत असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अनेक जण थेट स्टेडियमध्ये सामना पाहायला जाणार आहेत. टीम इंडियासाठी आणि ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका आगामी वनडे वर्ल्ड कपच्या हिशोबाने रंगीत तालीमच आहे. दरम्यान या पहिल्या सामन्याबाबत आपण सर्वकाही सविस्तर जाणून घेणार आहोत.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. विशेष म्हणजे विविध भाषांमध्ये हा सामना पाहता येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना मोबाईलवर डिजनी हॉटस्टार एपवर पाहता येईल. मात्र त्यासाठी सबस्क्रीपश्न असायला हवं.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात नितीन मेनन आणि केएन अनाथा पद्मनाभन हे फिल्ड अंपायर असणार आहेत. तर वीरेंद्र शर्मा थर्ड अंपायर असतील.
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ हे या सामन्याचे मॅच रेफरी असणार आहे. सामना क्रिकेटच्या नियमांनुसार चालतो की नाही, या सर्वाची जबाबदारी ही सामनाधिकारी अर्थात मॅच रेफरीची असते.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.
वनडे सीरीजसाठी टीम ऑस्ट्रेलिया | स्टीवह स्मिथ (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि एडम झम्पा.