मुंबई | बॉर्डर गावसकर ट्रॉफीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाचा हा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील सलग चौथा आणि भारतातील 16 वा मालिका विजय ठरला. त्यानंतर आता दोन्ही संघांसह क्रिकेट चाहत्यांना वनडे सीरिजचे वेध लागले आहेत. या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होत आहे.या दोन्ही संघांनी या पहिल्या सामन्यासाठी जोरदार तयारी केली. मात्र या सामन्याच्या 24 तासआधी एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसून येत आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यात येत्या पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊसही पडलाय. त्यामुळे सामन्याच्या दिवशी पाऊस झाला तर दोन्ही टीमसह क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो.
हवमान खात्याकडून 17 मार्चपर्यंत मुंबईत पाऊसासह ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे कुठेतरी सामन्यावर पावसाचं संकट आहे.
दरम्यान पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्या टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार नाहीये. वैयक्तिक कारणांमुळे तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी करणार आहे. दुसऱ्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स हा त्याच्या आईची प्रकृती गंभीर असल्याने परतला होता. मात्र चौथ्या कसोटी दरम्यान पॅटच्या मातोश्रींचे निधन झाले. यामुळे पॅट आता कुटुंबियांसोबतच थांबणार आहे. यामुळे आता स्टीव्हकडेच सूत्र देण्यात आली आहेत.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.
वनडे सीरीजसाठी टीम ऑस्ट्रेलिया | स्टीवह स्मिथ (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि एडम झम्पा.
पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई
दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम
तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई
या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.