मुंबई | शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कॅप्टन केएल राहुल या चौघांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडेत दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 277 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 48.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 281 धावा केल्या. कॅप्टन केएल राहुल याने विजयी सिक्स खेचला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल या सलामी जोडीने टीम इंडियाला चाबुक सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. एडम झॅम्पा याने ही जोडी फोडली. ऋतुराज 71 धावांवर आऊट झाला. ऋतुराजचं हे पहिलंच एकदिवसीय अर्धशतक ठरलं. ऋतुराजनंतर टीम इंडियाने झटपट 3 विकेट्स गमावले. श्रेयस अय्यर 3, शुबमन गि 74 आणि ईशान किशन 18 धावांवर आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची 4 बाद 185 अशी स्थिती झाली.
चांगल्या सुरुवातीनंतर झटपट विकेट्स गमावल्याने टीम इंडिया पिछाडीवर गेली. मात्र कॅप्टन केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी 80 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला विजय सोपा करुन दिला. या दरम्यान सूर्याने झुंजार अर्धशतक केलं. मात्र त्यानंतर सूर्या 49 बॉलमध्ये 50 धावांवरच आऊट झाला. त्यानंतर जडेजा मैदानात आला. केएलने विजयी सिक्स खेचत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. केएलने नाबाद 58 धावांची खेळी केली. तर जडेजा 3 धावांवर नाबाद परतला. तसेच ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पा याने 2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन पॅट कमिन्स आणि सीन एबोट या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
केएल राहुल याने मारलेला विनिंग सिक्स
Sealed with a SIX.
Captain @klrahul finishes things off in style.#TeamIndia win the 1st ODI by 5 wickets.
Scorecard – https://t.co/H6OgLtww4N… #INDvAUS@IDFCFIRSTBank pic.twitter.com/PuNxvXkKZ2
— BCCI (@BCCI) September 22, 2023
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मोहम्मद शमी याने 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला 276 धावांवर रोखलं. टीम इंडियाकडून शमीशिवाय रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन) डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरुन ग्रीन, जोस इंग्लिस (विकेटकीपर), मार्क्स स्टोयनिस, एम शॉर्ट, सिन एबोट आणि एडम झॅम्पा.