मोहाली | आयसीसी वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाने मोठा कीर्तीमान केला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या वनडेत 5 विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये नंबर ठरलीय. यासह टीम इंडियाने तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर 1 असण्याचा बहुमान मिळवला आहे. टीम इंडिया आधीच आयसीसी टी 20 आणि आणि टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी होती. त्यामुळे तिन्ही फॉर्मेटमध्ये पहिल्या स्थानी येण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय आवश्यक होता. त्यानुसार टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धुळ चारत नंबर वन होण्याचा कारनामा केलाय.
टीम इंडियाने पाकिस्तानला पछाडत अव्वल स्थानी झेप घेतलीय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तान पहिल्या आणि टीम इंडिया दुसऱ्या स्थानी होती. मात्र ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने पराभूत करत आयसीसी वनडे टीम रँकिंगमध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानी विराजमान झाली. तर पाकिस्तानची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आता टीम इंडियाच्या नावावर 42 सामन्यांमध्ये 116 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर पाकिस्तान 27 सामन्यांमध्ये 115 रेटिंग्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टीम इंडिया टेस्ट, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर वन होणारी दुसरी टीम ठरली आहे. याआधी अशी कामगिरी ही दक्षिण आफ्रिका टीमने केली होती. दक्षिण आफ्रिका 2012 साली तिन्ही प्रकारात आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 टीम होती. टीम इंडियासाठी वर्ल्ड कपआधी फार मोठी आणि अभिमानाची बाब आहे.
No. 1 Test team ☑️
No. 1 ODI team ☑️
No. 1 T20I team ☑️#TeamIndia reigns supreme across all formats 👏👏 pic.twitter.com/rB5rUqK8iH— BCCI (@BCCI) September 22, 2023
दरम्यान टीम इंडिया तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर 1 ठरल्याने सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे. बीसीसीआय सचिव जय शाह आणि आयसीसीने ट्विट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलंय.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन) डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरुन ग्रीन, जोस इंग्लिस (विकेटकीपर), मार्क्स स्टोयनिस, एम शॉर्ट, सिन एबोट आणि एडम झॅम्पा.