IND vs AUS 1st Odi | टीम इंडियाने टॉस जिंकला, तब्बल 20 महिन्यांनी या स्टार खेळाडूची एन्ट्री

| Updated on: Sep 22, 2023 | 1:59 PM

india vs australia 1st odi toss | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आधीच्या अखेरच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टॉस जिंकला आहे.

IND vs AUS 1st Odi | टीम इंडियाने टॉस जिंकला, तब्बल 20 महिन्यांनी या स्टार खेळाडूची एन्ट्री
Follow us on

मोहाली | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज 22 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला मोहालातील आयएस बिंद्रा स्टेडियमवर 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता टॉस पार पडला. टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन केएल राहुल याने फिल्डिंगचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. त्यामुळे आता टीम इंडियाचे स्टार बॉलर ऑस्ट्रेलियाला किती धावांपर्यंत रोखण्यात यशस्वी ठरतात याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी केएल राहुल याला टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाची धुरा सांभाळतोय.

आर अश्विन याची एन्ट्री

टीममध्ये तब्बल 20 महिन्यांनी स्टार खेळाडूचं कमबॅक झालंय. टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर आर अश्विन याचं 20 महिन्यांनी कमबॅक झालंय. आर अश्विन याने अखेरचा वनडे सामना हा 21 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळला होता. तसेच ऋतुराज गायकवाड यालाही प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. ऋतुराजला पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी देण्यात आली आहे. त्यानंतर तो एशियन गेम्समध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

दुखापतीनंतर श्रेयस अय्यर याचंही पुनरागमन झालंय. श्रेयसला दुखापतीमुळे आशिया कपमध्ये 1 सामना खेळल्यानंतर बाहेर बसावं लागलं होतं. मात्र आता तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध परतला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी वर्ल्ड कपआधी हे चांगले संकेत आहेत.

टीम इंडियाला नंबर 1 होण्याची संधी

दरम्यान टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना जिंकून तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर 1 होण्याची संधी आहे. टीम इंडिया आधीच टी 20 आणि टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना जिंकला, तर वनडेतही 1 नंबर होईल. त्यामुळे टीम इंडियाला हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवावा लागेल.

टीम इंडियाने टॉस जिंकला

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन) डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरुन ग्रीन, जोस इंग्लिस (विकेटकीपर), मार्क्स स्टोयनिस, एम शॉर्ट, सिन एबोट आणि एडम झॅम्पा.