नवी दिल्ली : थोड्याच वेळात मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत (IND vs AUS) आमनेसामने येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना मोहालीत होतोय. टी-20 (t20) विश्वचषकापूर्वी हा सामना महत्वाचा मानला जातोय. दोन्ही संघानं आपली तयारी मजबूत केली आहे. भारतीय संघाला T20 विश्वचषकापूर्वी फक्त 6 सामने खेळायचे आहेत, तर ऑस्ट्रेलियाचेही तेवढेच सामने आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध तीन सामने आणि इंग्लंडविरुद्ध त्यांच्या मायदेशात तीन सामने खेळणार आहे.
दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन थोड्याच वेळात जाहीर होतील. यापूर्वी संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या…
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत/दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन/युझवेंद्र चहल, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह
आरोन फिंच, मॅथ्यू वेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, अॅश्टन आगर, पॅट कमिन्स, डॅनियल सॅम्स, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड
संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. यापूर्वी थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे.या सामन्यात सर्वांच्या नजरा आशिया चषक 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीवर असतील.
मोहालीतही कोहलीच्या बॅटने धावा काढल्या. याच कारणामुळे चाहत्यांना विराटच्या बॅटमधून धावा काढायला आवडेल.भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 सामना पाहण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये पोहोचू लागले आहेत.ते सर्व एक रोमांचक स्पर्धेची अपेक्षा करतील.