विशाखापट्टणम | टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्याच टी 20 सामन्यात जोस इंग्लिस याने धमाकेदार सुरुवात केली आहे. जोस इंग्लिस याने टीम इंडिया विरुद्ध खणखणीत आणि वादळी शतकी खेळी केली आहे. जोसने अवघ्या 47 बॉलमध्ये शतक केलं आहे. जोसच्या टी 20 कारकीर्दीतील हे पहिलं शतक ठरलं आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 31 धावांवर पहिली विकेट गमावली. मॅथ्यू शॉर्ट 11 बॉलमध्ये 13 धावा करुन आूट झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावातील 5 व्या ओव्हरमध्ये जोस इंग्लिस बॅटिंगसाठी आला. जोसने स्टीव्हन स्मिथ याच्यासोबत शतकी भागीदारी करत सेंच्युरी केली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला 200 पार धडक मारता आली.
जोसने शतक पूर्ण करण्यासाठी अवघे 47 चेंडू खेळले. जोसने 17 व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंह याच्या बॉलिंगवर सलग 3 चौकार ठोकून शतक पूर्ण केलं. जोसला शतकानंतर मोठी खेळीची संधी होती. मात्र जोस शतकानंतर लवकर आूट झाला. प्रसिध कृष्णा याने जोसला 18 व्या ओव्हरमध्ये आऊट केलं. जोसने 50 बॉलमध्ये 110 धावा केल्या. जोसने या खेळीदरम्यान 11 चौकार आणि 8 सिक्स ठोकले.
जोसच्या या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 208 धावा करता आल्या. त्यामुळे आता टीम इंडियासमोर आता विजयासाठी 209 धावांचं आव्हान आहे. जोस इंग्लिस व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ याने सर्वाधिक 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. दरम्यान हाच जोस इंग्लिस टीम इंडियासाठी वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियासाठी नासूर ठरला होता. या इंग्लिसने विकेटकीपर म्हणून अंतिम सामन्यात 4 कॅच घेतल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस, अॅरॉन हार्डी, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, शॉन एबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तनवीर संघा.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन | ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसीध कृष्णा.