विशाखापट्टणम | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात विजय मिळवला. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 209 धावांचं आव्हान हे 8 विकेट्सच्या मोबदल्यात 1 बॉल राखून पूर्ण केलं. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. तर रिंकू सिंह याने निर्णायक खेळी केली. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 80 आणि इशान किशन याने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिंकू सिंह याने टीम इंडिया अडचणीत असताना नाबाद 22 धावांची खेळी केली.
तसेच सूर्यकुमार यादव याच्या कर्णधारपदाच्या नव्या इनिंगला विजयाने सुरुवात झाली. सूर्याला 80 धावांच्या खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. सूर्यकुमारने यासह रोहित शर्मा याचा रेकॉर्ड ब्रेक केला. तर आता सूर्याच्या निशाण्यावर विराट कोहलीचा रेकॉर्ड आहे.
सूर्याने कांगारुंविरुद्ध 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. या धुव्वाधार कामगिरीसाठी सूर्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं. सूर्याची टी 20 कारकीर्दीत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याची ही 13 वी वेळ ठरली. यासह सूर्याने रोहितला मागे टाकलं. रोहितला टी 20 क्रिकेटमध्ये 12 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला आहे.
रोहितने 148 टी 20 सामन्यांमध्ये 12 वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. तर सूर्याने अवघ्या 54 मॅचमध्ये 13 वेळा ही कामगिरी केली आहे. तर विराट कोहली याला 115 सामन्यांमध्ये 15 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलंय. त्यामुळे आता सूर्याने आणखी 2 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला तर विराटच्या विक्रमाची बरोबरी होईल. तसेच तिसऱ्यांदा हा मान मिळवता विराटचा विक्रमही नेस्तानाबूत होईल.
सूर्यकुमार यादव चमकला
Most Player of the match awards for India in T20I:
Virat Kohli – 15 (115 matches)
Suryakumar Yadav – 13* (54 matches)
Rohit Sharma – 12 (148 matches) pic.twitter.com/ORJr7WjxMG— Johns. (@CricCrazyJohns) November 23, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस, अॅरॉन हार्डी, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, शॉन एबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तनवीर संघा.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन | ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसीध कृष्णा.