INDvsAUS : टीम इंडियाचा पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

| Updated on: Feb 11, 2023 | 4:10 PM

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर नागपूर कसोटी सामन्यात धमाकेदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 1 डाव आणि 132 धावांनी धुव्वा उडवला आहे.

INDvsAUS : टीम इंडियाचा पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
Follow us on

नागपूर : टीम इंडियाने नागपूर कसोटीतील तिसऱ्याच दिवशी धमाका केला आहे. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कांगारुंचा तिसऱ्याच दिवशी पराभव केला आहे. टीम इंडियाचा हा साधासुधा विजय नाही. टीम इंडियाने 132 धावा आणि एका डावाने हा विजय मिळवला आहे. कर्णधार रोहित शर्मा, ऑलराउंडर रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल या विजयाचे हिरो ठरले. टीम इंडियाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाचा शानदार विजय

हे सुद्धा वाचा

सामन्याचा धावता आढावा

टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अवघ्या 177 धावांवर बाजार उठवला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात ऑलआऊट 400 धावा केल्या. यासह टीम इंडियाने 223 धावांची आघाडी मिळवली.

ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात 223 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात आली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात आणखी वाईट स्थिती केली. ऑस्ट्रेलियाला अवघ्या 91 धावांवर गुंडाळलं.

टीम इंडियाच्या विजयाचे हिरो

कर्णधार रोहित शर्मा, ऑलराउंडर रवींद्र जडेजा, स्पिनर अक्षर पटेल, अनुभवी फिरकीपटू आर अश्विन हे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

सर्वात आधी टीम इंडिया अडचणीत असताना रोहितने 120 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर अक्षर पटेल आणि जडेजा या दोघांनी भागीदारी करत टीम इंडियाच्या पहिल्या डावा स्थिरता मिळवून दिली. जडेजाने पहिल्या डावात 70 तर अक्षरने 84 रन्सचं योगदान दिलं.

तसेच पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग करताना जडेजाने शानदार 5 विकेट्स घेतल्या. अश्विनने 3 आणि शमी-सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तर दुसऱ्या डावात अश्विनने कांगारुंच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जडेजा आणि शमीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर अक्षरने 1 विकेट घेतली. जडेजाने केलेल्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ या पु्रस्काराने गौरवण्यात आलं.

दुसरा कसोटी सामना कुठे होणार?

दरम्यान मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमम्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.