INDvsAUS | टीम इंडियाकडून लाजिरवाणा पराभव, दिग्ग्ज खेळाडू ऑस्ट्रेलिया टीमवर संतापला

| Updated on: Feb 11, 2023 | 11:43 PM

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पहिल्याच कसोटी सामन्यात एका डावाने आणि 132 धावांनी खुर्दा उडवला.ऑस्ट्रेलियाच्या या लाजिरवाण्या पराभवामुळे दिग्गज खेळाडू चांगलाच संतापला आहे.

INDvsAUS |  टीम इंडियाकडून लाजिरवाणा पराभव, दिग्ग्ज खेळाडू ऑस्ट्रेलिया टीमवर संतापला
Follow us on

नागपूर : टीम इंडियाने नागपूर कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा 1 डाव आणि 132 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलिया पराभवाची धुळ चारली. टीम इंडिया या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. निराशाजनक पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या गोटात अत्यंत निराशाजनक वातावरण होतं. या अशा पराभवानं ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू हा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर चांगलाच संतापला. या दिग्गजाने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची चांगलीच शाळा घेतली.

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचे सुनील गावसकर आणि ऑस्ट्रेलियाचे एलन बॉर्डर या दोघांचं आडनाव या ट्रॉफीत आहे. हे दोघेही आपल्या संघाचे माजी कर्णधार राहिले आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे बॉर्डर आपल्याच टीमवर नाराज आहेत.

बॉर्डर यांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या भूमिकेवरुन नाराजी व्यक्ती केली. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पूर्ण समर्पणाने खेळले नसल्याने बॉर्डर यांनी त्यांची शाळा घेतली. बॉर्डर यांचा संताप आणखी एक कारणाने जास्त वाढला, ते कारण म्हणजे स्टीव्ह स्मिथ टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजाच्या बॉलिंगवर बीट झाला तेव्हा त्याने ‘थंब्स अप’चा इशारा केला.

हे सुद्धा वाचा

बॉर्डर काय म्हणाले?

“जेव्हा ते लोक (टीम इंडिया) ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलिंगने बॅट्समनला बीट करत होते, तेव्हा आम्ही थम्स अप करत होतो. काय तमाशा चाललाय? हे हास्यास्पद आहे. मुर्ख बनू नका. ऑस्ट्रेलिया टीम पूर्णपणे कडवी झुंज देते. पण इथे तुम्ही पूर्णपणे सरेंडर केलं”, असं बॉर्डर संतापून म्हणाले.

दरम्यान टीम इंडियाने पहिल्या सामन्यात विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्याच्या दिशेने पुढचं पाऊल टाकलं आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना हा 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

उर्वरित कसोटी मालिकेचं वेळापत्रक

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.